महाराष्ट्र

अंबाजोगाईची अनुष्का लोहिया इंडियन फॉरेस्ट सर्विसेस मध्ये भारतात चौथी

अंबाजोगाई (प्रतिनिधी)–
युपीएससी अंतर्गत घेण्यात येणा-या इंडियन फॉरेस्ट सर्विसेस परीक्षेत अंबाजोगाई येथील अनुष्का अभिजित लोहिया हीने भारतात चौथ्या क्रमांकावर येण्याचा मान मिळवला आहे.
अंबाजोगाई येथील अनुष्का ही प्रख्यात -हदयरोग तज्ञ डॉ. शुभदा आणि प्रा. अभिजित यांची मुलगी आहे. उच्च माध्यमिक शिक्षणानंतर अनुष्का हीन बी. इ (सिव्हील) ही परीक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण करुन आपले लक्ष युपीएससी परीक्षेकडे वळवले. शास्त्रीय नृत्य, चित्रकला, फोटोग्राफी हे निसर्गदत्त छंद जोपासत तीने आपल्या आवडीच्या जंगल वन क्षेत्रात आपले करियर निवडले आणि युपीएससी अंतर्गत घेण्यात येणा-या इंडियन फॉरेस्ट सर्विसेस मध्ये करीयर करायचे निश्चित करुन या परी‌क्षेची जोरदार तयारी केली. या परीक्षेचा निकाल आज लागला असून या परीक्षेत अनुष्का हीने संपुर्ण भारतात चौथा क्रमांक पटकावला आहे.
शालेय जीवनापासूनच अनुष्का हीने अभ्यासासोबतच शास्त्रीय नृत्य, फोटोग्राफी, चित्रकला, निसर्ग प्रेम, पर्यटन हे छंद अत्यंत चांगल्या पद्धतीने जोपासले असुन या चंद्राच्या माध्यमातुन तीने बनवलेल्या शॉर्ट फिल्म ला आंतरराष्ट्रीय नामांकन ही मिळवले आहे.
अनुष्का लोहिया हीने मिळवलेल्या अभुतपुर्व यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker