१३ फेब्रुवारी रोजी अल-फलाह पतसंस्थेचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230209_174137-300x254.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230209_174137-300x254.jpg)
अंबाजोगाई शहर व तालुक्यातील नागरिकांची आर्थिक गरज लक्षात घेऊन अल-फलाह नागरी सहकारी पतसंस्थेचा भव्य शुभारंभ सोमवारी दिनांक १३ फेब्रुवारी या दिवशी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे . तेव्हा या शुभारंभ प्रसंगी शहर व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अल-फलाह नागरी पतसंस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी चेअरमन खालेद चाऊस उपाध्यक्ष हाजी महमूद दादामिया यांनी केले आहे .
यांच्या हस्ते होणार उद्घाटन
अल-फलाह नागरी सहकारी पतसंस्थेसाठी उद्घाटक म्हणून जनाब सय्यद शाफिक हाश्मी(चेअरमन, राहत अरबन क्रेडिट को ऑप. सो. लि. बीड) तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना अफसर खान, जनाब सोफी अहमद रजा आरिफ, जनाब सय्यद अनवर जाफर,तसेच ऍड सुनील सौंदरमल हे लाभणार आहेत.
छोटे व्यावसाय वृध्दिंगत करण्याचे उद्दिष्ट
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230209_174205-300x77.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230209_174205-300x77.jpg)
अल-फलाह नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर व परिसरातील छोटे मोठे व्यापारी, फळ व भाजीपाला विक्रेते, हातगाडीवाले यांना त्यांचा व्यापार वृद्धिंगत करण्यासाठी या पतसंस्थेच्या माध्यमातून अत्यल्प दरात अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. तेव्हा याचा फायदा सर्वांनी घ्यावा असेही आवाहन पतसंस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.
पतसंस्थेचे संस्थापक राजकिशोर मोदी हे वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांना सेवा देत आहेत. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन राजकिशोर मोदी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने वेळोवेळी योग्य ती पावले उचलताना दिसून येतात. अशीच नागरिकांची नड व गरज लक्षात घेऊन अल-फलाह नागरी सहकारी पतसंस्थेची सुरुवात करत आहेत . अल-फलाह नागरी सहकारी पतसंस्था ही छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स येथे स्थापित झाली असून त्याचा शुभारंभ सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230209_174235-949x1024.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG_20230209_174235-949x1024.jpg)
राजकिशोर मोदी व इतरांनी केले आवाहन
तरी या शुभारंभ प्रसंगी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन अल- फलाह पतसंस्थेचे अध्यक्ष शेख खालेद चाऊस उपाध्यक्ष हाजी महेमुद दादामिया यांच्यासह संचालक शेख मोईन शेख रहीम, रशीद इब्राहिम बागवान, अनिस गफूर खान पठाण, अजीम शहाबुद्दीन जरगर, भूषण कांताप्रसाद मोदी, कैलास बालाजी कांबळे, देशमुख जरीना अहमद पाशा, अलीमुनिसा समियोद्दीन खतीब यांच्या वतीने करण्यात आले आहे.