महाराष्ट्र
११ वी प्रवेशासाठी शिक्षण विभागाने केले नवीन वेळापत्रक जाहीर


शैक्षणिक सत्र 2025-26 मधील इयत्ता 11 वी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने करण्याबाबत राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश सर्वप्रथम करण्यात येत आहेत.
वेळा पत्रकाप्रमाणे दिनांक 26 जून 2025 ला विद्यार्थ्यांना व शाळा महाविद्यालयांना पहिल्या फेरीतील प्रवेश यादी जाहीर करणे निश्चित करण्यात आले होते.
शासनाने काढले नवीन शुध्दिपत्रक


परंतू शासन शुध्दीपत्रक क्रमांक प्रवेश 1225/प्र.क्र.-16/एसडी-2 दिनांक 23 जून 2025 रोजी ला अन्वये मा. न्यायालय निर्णयाप्रमाणे इयत्ता 11 वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये अल्पसंख्यांक समुदायाच्या शाळा महाविद्यालय मधील एकूण प्रवेश क्षमते मधील प्रवेशाबाबत फेरबदल करणे अपेक्षित आहे असे असताना काही मा. न्यायालयीन प्रकरणे व तांत्रिक बाबींमुळे प्रवेश प्रक्रिये मधील दिनांक 26 जून 2025 ला जाहीर करण्यात येणाऱ्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय संलग्न उच्च माध्यमिक शाळांच्या गुणवत्तेनुसार विद्यार्थी प्रवेश याद्या जाहीर करता येणार नाहीत.
संगणक प्रणाली मध्ये आवश्यक ते बदल करून पारदर्शक व निकोप पध्दतीने प्रक्रिया होण्यासाठी पुढील प्रमाणे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे.

