अनेक वर्षांपासूनची मागणी पुर्ण करण्यात आ. नमिता मुंदडा यांना यश
येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयास मल निस्तारण आणि जलनिस्तारण प्लॅन्ट साठी ४ कोटी ७ लक्ष ८३ हजार रुपयांच्या निधीला महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या वतीने नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
या वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विभागातील मला आणि जल निस्सारण करण्याची खुप मोठी समस्या गेली अनेक वर्षांपासून होती. आ. नमिता मुंदडा यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता या दोन्ही महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचा स्वतंत्र आदेश
महाराष्ट्र राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्ये विभागाने या संदर्भात शासन निर्णय क्र. एस एच ए -२०२५/प्रा.क्र.२६६/प्रशा-१ दि. १५ जुलै २०२५ रोजी यासंदर्भात एक स्वतंत्र शासन निर्णय जाहीर केला असून या निर्णयात पुढे असे म्हटले आहे की, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या अधिपत्याखालील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथे Effluent Treatment Plant (ETP) आणि Sewage Treatment Plant (STP) जलनिस्सारण आणि मला निस्सारण प्लॅन्ट बसविणे या कामासाठी रुपये ४,०७,८३,३३५/- (रुपये चार कोटी, सात लक्ष, त्र्याऐंशी हजार, तीनशे पसतीस फक्त) (सर्व करांसहीत) इतक्या रक्कमेच्या बांधकाम अंदाजपत्रकास पुढील अटींच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.
काय म्हणाले आहे आदेशात?
सदर काम करण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबाबत पुर्तता करण्यात यावी. प्रस्तुत काम पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येत असल्यास संबंधित विभागाची तसेच महानगरपालिका व तत्सम प्राधिकरणे यांची पूर्व परवानगी घेण्यात यावी. तांत्रिक मंजूरी देताना राज्य दरसूचीबाह्य बाबींच्या दराकरीता शासन परिपत्रक क्रमांक -२०१७/प्र.क्र.११/नियोजन-३, दिनांक ११.०४.२०१७ नुसार कार्यवाही करण्यात यावी. प्रस्तावातील खरेदीशी संबंधित बाबींकरीता ई-निविदा प्रणालीचा अवलंब करुन उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील दिनांक २४.०८.२०१७ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित केलेल्या सूचना विचारात घ्याव्यात. प्रत्यक्ष काम करतेवेळी पर्यावरण विभाग, शासन निर्णय, इएनव्ही-२०१३/प्र.क्र.१७७/तां.क्र.१, दिनांक १० जानेवारी, २०१४ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यवाही करण्यात यावी.
स्थापत्य कामाच्या कालावधीतच विद्युतीकरणाबाबत तसेच इतर अनुषंगिक कामांचे योग्य नियोजन करुन सदर कामे पूर्ण करावीत. इमारतीमध्ये दिव्यांगाकरीता उपलब्ध करुन द्यावयाच्या विविध सोयीबाबत शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात यावी.
विषयांकित कामाकरीता सुधारीत प्रशासकीय मान्यतेची आवश्यकता लागणार नाही, यादृष्टीने विशेष दक्षता घेऊन काम करण्यात यावे.
जल आणि मल निस्सारण बनली होती समस्या
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विभागातील अंतररुग्ण, बाह्यरुग्ण, कार्यालयीन कर्मचारी व रुग्ण शुश्रुषा साठी येणारी मोठी संख्या लक्षात घेता या सर्वांचे मला निस्सारण आणि जल निस्सारण करणे ही एक मोठी समस्या बनली होती. ही समस्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडे या विभागाच्या आ. नमिता मुंदडा यांनी सातत्याने पाठपुरावा करुन या दोन स्वतंत्र युनीट साठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी सातत्याने मागणी केली होती.
या मागणी व पाठपुराव्याच्या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्ये विभागाच्या वतीने या विभागाच्या अव्वर सचीव सुधीर ज्या शेट्टी यांनी या संदर्भात १५ जुलै २०२५ रोजी स्वतंत्र आदेश काढुन या दोन स्वतंत्र प्रकल्पासाठी ४ कोटी ७ लक्ष ८३ हजार ३३५ रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
▪️आ. नमिता मुंदडा यांनी व्यक्त
केले आभार!
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विभागात उपचारासाठी येणारे रुग्ण, नातेवाईक, रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय विभागाचे कर्मचारी या़च्या मल आणि जल निस्सारणाचा प्रश्न क्लिष्ट बनत चालला असताना हा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे मंत्री ना. हसन मुश्रीफ, अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे, माजी खा. डॉ. प्रितम मुंडे यांनी सहकार्य केल्याबद्दल त्या़चे व सर्व संबंधित मंत्री, अधिकारी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.