महाराष्ट्र

स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाला उच्च स्तरावर नेण्यासाठी प्रयत्न करणार

खा. डॉ. अजित गोपछडे यांचे आश्वासन


स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाला वैद्यकीय क्षेत्रात राज्याच्या उच्च स्तरावर नेण्याचा प्रयत्न करणार असे मत या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा राज्यसभेचे नवनिर्वाचित खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केले.
राज्यसभेच्या सदस्य पदी नियुक्ती झाल्यानंतर खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आज प्रथमच अंबाजोगाई शहरास भेट दिली. यावेळी सर्वप्रथम आ. नमिता मुंदडा यांच्या निवासस्थानी मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या नंतर खा. डॉ. अजित गोपछडे यांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली. यावेळी कॉलेज कॉन्सिलच्या हॉलमध्ये त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.

वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी सत्कार केला. यानंतर या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यासोबतच पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केलेले व मार्ड संघटनेचे हिरहिरीने काम करणारे त्यांचे सहकारी मित्र इएनटी चे विभागप्रमुख डॉ. प्रशांत देशपांडे व इतर सहका-यांनी, पदव्युत्तर विद्दार्थी संघटना, युजी विद्दार्थी संघटना, चतुर्थ कर्मचारी संघटना, कार्यालयीन कर्मचारी संघटना, परिचारिका संघटना, शहरातील मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, अंबाजोगाई मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन व ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार यांनी त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
प्रारंभी अधिष्ठाता डॉ. शंकर धपाटे यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रलंबित प्रश्न आणि दैनंदिन कामकाजात येणाऱ्या अडचणींची माहिती खा. डॉ. अजित गोपछडे यांना देवून या अडचणी सोडविण्यासाठी एक निवेदन दिले. यानंतर डॉ. मुकुंद मोगरेकर व डॉ. प्रशांत देशपांडे यांनी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन त्यांच्या उज्वल राजकीय भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.


आपल्या सत्काराला उत्तर देताना खा. डॉ. अजित गोपछडे यांनी आपण या वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आलो आणि आपले भविष्य बदलून गेले असे सांगताना या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेत असताना आपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक प्रमुख कार्यकर्त्यांच्या सहवासात आलो. महाराष्ट्राचे लोकनेते गोपिनाथ मुंडे, प्रमोद महाजन यांच्या सहवासात काम करण्याची संधी येथेच मिळाली. राजकारणाचे प्राथमिक धडे, प्राथमिक शिक्षण मला याच शहराने दिले. या शहरात आपण पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी आलो नसतो तर आपल्या राजकीय प्रवासास सुरुवात झाली नसती आणि खासदार होण्याची संधी ही मिळाली नसती असे मत त्यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात काम करणारा सर्व डॉक्टर्स आणि कर्मचारी हा सेवावृत्तीनेच वैद्यकीय सेवा करतो याची मला जाणीव आहे आहे आणि म्हणूनच या वैद्यकीय महाविद्यालयास मी राज्यातील उच्च स्तरावर नेण्यासाठी सर्व प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या प्राध्यापकांनी वैद्यकीय शिक्षण व रुग्ण सेवा देण्यासोबतच संशोधन क्षेत्रात ही काम करावे, या महाविद्यालयातील अत्याधुनिक संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी आपण विद्यापीठ आणि केंद्रशासनाच्या मार्फत मिळणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देवून अशी ग्वाही खा. डॉ. अजित गोपछडे यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास वैद्यकीय महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश कचरे, डॉ. प्रशांत देशपांडे, डॉ. संदिप निळेकर, डॉ. दिपक लामतुरे, डॉ. संतोष गिरेबोईनवाड, डॉ. एकनाथ शेळके, डॉ. अनिल मस्के, डॉ . कावळे, अधिसेविका कुरतडकर यांच्या सह सर्व विभाग प्रमुख, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जाधव, रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाच्या कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष महादु मस्के व इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. अमित लोमटे यांनी मानले.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker