महाराष्ट्र

वृध्दत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रातील रीक्त जागा भरण्यास मान्यता

बीड जिल्ह्याच्या लोकनेत्या व माजी सार्वजनिक आरोग्य मंत्री कै. आ. डॉ. सौ. विमल मुंदडा यांच्या पुढाकाराने लोखंडी सावरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या वृध्दत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रात गेली अनेक वर्षांपासून रीक्त असलेल्या ७९ जागा तात्काळ कांत्राटी पध्दतीने भरण्याच्या सुचना आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिल्या आहेत. या विभागाच्या आ. नमिता मुंदडा यांनी गेली दोन वर्षांपासून या संदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.
या विभागाच्या लोकनेत्या व तत्कालीन सार्वजनिक आरोग्य मंत्री कै. आ. डॉ ‌ सौ‌ विमल मुंदडा यांनी त्या काळी भविष्यात लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लोखंडी सावरगाव येथे कोट्यवधी रुपये खर्चून बेंगलोर येथे उभारण्यात आलेल्या वृध्दत्व निवारण मानसिक आजार उपचार व संशोधन केंद्राच्या आधारावर महाराष्ट्रातील एकमेव भव्य अशा महत्वकांक्षी रुग्णालयाची उभारणी केली. यासाठी आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून ही इमारत उभी केली. सदरील इमारत उभी केल्यानंतर अनेक वर्षे हे केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक कर्मचारी उपलब्ध झाले नसल्याने या इमारतीत धुळ खात पडून राहिल्या होत्या.


गेल्या दोन वर्षांपुर्वी कोवीड साथ रोगाच्या संक्रमण काळात या तत्कालीन सिव्हील सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्या पुढाकाराने या इमारतीत जम्बो कोवीड हॉस्पिटल सुरू करण्यात आले. कोवीडची लाट ओसरल्यानंतर या ठिकाणी आ‌ नमिता मुंदडा यांच्या प्रयत्नामुळे परत वृध्दत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र व स्त्री रुग्णालय सुरू करण्यात आले. यापैकी या ठिकाणी सुरू असलेल्या वृध्दत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रातील ७९ रीक्त रीक्त जागा भरण्यासाठी राज्य शासनाकडे या विभागाच्या लोकप्रतिनिधी आ. नमिता मुंदडा यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अलिकडेच राज्यातील सत्तेत बदल होवून भाजपा एकनाथ शिंदे गटाची सत्ता अस्तित्वात येताच आ. नमिता मुंदडा यांनी या रीक्त जागा भरण्यासाठी पुन्हा पाठपुरावा सुरू केला. आ. नमिता मुंदडा यांच्या या मागणीची विशेष दखल घेवून या रीक्त जागा भरण्यासाठीचे आदेश सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांच्या सुचनेनुसार सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपसंचालक हेमंतकुमार बोरसे यांनी काढले आहेत.
या संदर्भात सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या सुचनेनुसार हेमंत कुमार बोरसे यांनी काढलेल्या आदेश क्रं. उसासे/ एन एच एम ३५५४-५६ नुसार लोखंडी सावरगाव येथील वृध्दत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्रातील ७९ रीक्त जागा तातडीने कंत्राटी पद्धतीने भरण्यात याव्यात अशा सुचना दिल्या आहेत. या ७९ रीक्त जागांपैकी ६८ पदे हे कुशल कामगारांची तर ११ पदे ही अकुशल कामगारांची आहेत. कुशल कामगारांमध्ये २१ अधिपरिचारीकासह आहारतज्ञ, रक्तपेढी तज्ञ, क्ष किरण तज्ञ, इसीजी तज्ञ, प्रयोगशाळा तज्ञ, नेत्र शैल्यचिकित्सक गट ब, नेत्र चिकित्सा अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आयुष, वैद्यकीय अधिकारी होमिओपॅथिक, वैद्यकीय अधिकारी युनानी, योगा व नेपॉथिस्ट, कनिष्ठ लिपिक,२ बाह्यरुग्ण लिपीक, २ शिपाई, बाह्य रुग्ण सेवक, ३ अपघात रुग्ण सेवक, रक्तपेढी परीचर, शस्त्रक्रिया गृह परिचर, व्रण उपचारक,१४ कक्ष सेवक यांचा समावेश आहे तर अकुशल कामगारांमध्ये २ परीचर, २ कक्ष सेवक, ७ सफाई कामगार अशा ११ कामगारांचा समावेश राहणार आहे.

आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुराव्याला यश

लोखंडी सावरगाव येथे सुरू करण्यात आलेल्या वृध्दत्व निवारण मानसिक आजार व उपचार केंद्रातील रीकृत जागा भरण्यात याव्यात या मागणीसाठी आ. नमिता मुंदडा यांनी यापुर्वी सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाला १३ जुलै २०२१ , १४ सप्टेंबर २०२१, १८ नोव्हेंबर २०२१, ८ जुलै २०२२, ३ ऑगस्ट २०२२ निवेदने देवून या मागणीसंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. अलिकडेच सत्तांतरानंतर आ. नमिता मुंदडा यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दीले होते. या निवेदनाची दखल घेवून कंत्राटी पद्धतीने तातडीने या रीक्त जागा भरण्यासंदर्भातील आदेश देण्यात आले आहे.

ना. सावंत यांचे मानले आभार!

गेली अनेक वर्षांपासून लोखंडी सावरगाव येथील वृध्दत्व निवारण मानसिक आजार उपचार व संशोधन केंद्रातील रीक्त जागा भरण्याबाबत सार्वजनिक आरोग्य मंत्री ना. तानाजी सावंत यांनी नुकत्याच काढलेल्या आदेशाबाबत आ. नमिता मुंदडा यांनी ना. तानाजी सावंत यांचे आभार मानले आहेत.

अशी होणार भरती

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या वतीने या केंद्रातील ७९ जागा कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व जागा राज्यातील शासकीय रुग्णालयात कुशल कामगार आणि अकुशल कामगारांची भरती करणा-या अधिकृत एजन्सी मार्फत लवकरच भरती करण्यात येतील असे या वृध्दत्व निवारण मानसिक आजार उपचार व संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी सांगितले.
राज्यातील शासकीय रुग्णालयात ज्या पध्दतीने खाजगी एजन्सी मार्फत कंत्राटी पद्धतीने सुरक्षा कर्मचारी भरती केले जातात त्याच पध्दतीने या कुशल आणि अकुशल कामगारांची कंत्राटी पद्धतीने भरती होईल. ही भरतीची सर्व प्रक्रिया सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या वतीनेच पुर्ण करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker