विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहातील आसन व्यवस्था मोडकळीस


अंबाजोगाई नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहातील आसन व्यवस्था मोडकळीस आली असल्यामुळे संयोजक आणि नागरीकात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने अनेक वर्षापुर्वी सुरु करण्यात आलेले आद्दकवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृह मोडकळीस आल्या मुळे दहा वर्षांपुर्वी नगर परिषद कार्यालय इमारतीच्या वर साधारणतः दहा वर्षांपूर्वी निर्माण करण्यात आलेल्या विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहातील आसन व्यवस्था अत्यंत मोडकळीस आली आहे.
२०० खुर्च्या पैकी ४० तुटलेल्या…!


या सभागृहात साधारणपणे २०० आसन क्षमता ही आहे अत्यंत आधुनिक पध्दतीने बांधण्यात आलेले हे सांस्कृतिक सभागृह सुरुवातीचे काही वर्षे नगर परिषदेच्या वतीने चालवण्यात आल्या नंतर हे सभागृह खाजगी विकासकाला व्यावसायिक तत्त्वावर चालवण्यासाठी देण्याचा निर्णय नगर परिषद सभागृहाने घेतला. विकासकाकडे ठराविक रकमेच्या वार्षिक भाडेतत्त्वावर हे सभागृह काही अटी शर्तींवर देण्यात आले. या सभागृहाच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी विकासाकडे सोपविण्यात आली. या सभागृहात असलेल्या २०० आसनव्यस्थेसाठी असलेल्या ४० खुर्च्या या तुटलेल्या अवस्थेत आहे. सभागृहातील प्रत्येक ओळीमधील दोन-चार खुर्च्या या तुटलेल्या अवस्थेत आहेत तर अर्ध्याधिक खुर्चा या एका बाजूला मानटाकलेल्या अवस्थेत आपले अस्तित्व कसेबसे टिकवून आहेत. सभागृहातील आसन व्यवस्थेची अशी दुर्दशा झाली असल्यामुळे कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांना मजबुत खुर्ची कोठे आहे याचा शोध घेत बसण्याची वेळ आली आहे.


दुरुस्ती ची मागणी
सभागृहातील मोडकळीस आलेल्या या आसन व्यवस्थेमुळे कार्यक्रम आयोजित करणा-या संयोजक आणि नागरीकांकडुन या मोडलेल्या खुर्च्यांची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.