महाराष्ट्र
लग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल
चक्क लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असल्याने खळबळ उडाली आहे.
अत्याचारित मुलगी ही अंबाजोगाई शहरात आई आणि भावासोबत राहते. पुणे येथील युवक २३ फेब्रुवारी घरी आला यावेळी आई शिवणकाम करण्यासाठी आणि भाऊ शिकवणी क्लास ला गेलेला होता याच संधीचा फायदा घेत युवकाने तुझ्याशी लग्न करतो म्हणून अत्याचार केला. दरम्यान सदरील युवक हा पुणे येथे निघून गेला.
अत्याचारीत मुलगी दोन महिन्याची गर्भवती असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी ऋषी दिंडोरो (पुणे) याच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात कलम ३७६भादवी सह कलम ४,८,१२ पोक्सो अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या शोधत पिंक पथक रवाना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.