मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठोकला इर्शाळवाडीत तळ; बचाव कार्यात भाग
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230720_190103-1024x393.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230720_190103-1024x393.jpg)
गडावर पायी चढुन उधवस्त झालेल्या लोकांच्या झाल्या व्यथा
विधानभवनातले कामकाज संपवून बुधवारी सायंकाळी नियंत्रण कक्षातून राज्यातल्या मुसळधार पावसाचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अगदी सकाळीच दर कोसळलेल्या इरशाळवाडीला पोहचले आणि दिवसभर बचाव कार्याचे नेतृत्वच केले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230720_190619-1024x645.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230720_190619-1024x645.jpg)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुसते गडाच्या पायथ्याशी येऊन थांबले नाही तर गडावर चढून उद्ध्वस्त झालेल्या वस्तीवर प्रत्यक्ष पोहोचून त्यांनी संपूर्ण बचाव कार्याचे नियंत्रण केले. भर पावसात विश्रांती न घेता, रेनकोट घालून स्वतः बचावकार्यात उतरलेले मुख्यमंत्री पाहून बरोबरचे अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा अवाक झाले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230720_190632-1024x555.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230720_190632-1024x555.jpg)
विशेष म्हणजे आज विधिमंडळ अधिवेशनाचा चौथा दिवस. मात्र या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दोन्ही ही उपमुख्यमंत्र्यांवर कामकाजाची जबाबदारी टाकली आणि स्वत:ला बचावकार्यात झोकून
दिले.
राज्याचे मुख्यमंत्री आज एका सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेत दिसले. मुख्यमंत्र्यांनी भर पावसात इरशाळवाडीकडे चढाईला सुरूवात केली. चिखलाने निसरडा झालेला रस्ता पायी तुडवत ते वस्तीवर पोहचले. मुख्यमंत्र्यांच्या या धाडसाच सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर सर्व यंत्रणांनी आणखी वेग घेतला. प्रतिकूल हवामान, अवघड चढण यावर मात करीत मुख्यमंत्री शिंदे ग्रामस्थांशी चर्चा करीत मजल दरमजल करीत चढण चढत होते.