मांजरा धरणात फक्त २२टक्केच पाणीसाठा शिल्लक!


२२४.०९३ दलघमी साठवण क्षमता; फक्त ८७.५८६ दलघमी पाणी साठा शिल्लक
यावर्षी मृग नक्षत्र उलटुन दुसरी दोन नक्षत्र उलटली तरी या विभागात पावसाने आपली हजेरी लावली नव्हती. आता जूलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर पेरणीयोग्य पावूस झाल्यानंतर पेरण्या पुर्ण झाल्या आहेत मात्र बीड लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा करणा-या मांजरा धरणात फक्त ८७.५८६ दलघमी एवढाच पाणीसाठा उपलब्ध राहिला आहे.
यावर्षी पावसाने उशीरा हजेरी लावली असल्यामुळे पेरण्यासाठी जुलै महिन्याची वाट पहावी लागली. पावसाळा सुरू होवून एक महिना उलटला तरी या विभागात दमदार पाऊस झाला नसल्याने मांजरा धरणातील पाणी साठा सातत्याने कमी होत चालला आहे. आज १७ जुलै २३ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत २२४.०९३ दलघमी पाणी साठवण क्षमता असलेल्या मांजरा धरणात फक्त ८७.५८६ दलघमी पाणी साठा शिल्लक राहिला आहे. तर ६४२.३७ मीटर वरील पाणी पातळी ६३७.९३ मीटर पर्यंत येवून ठेपली आहे.


बीड-लातूर-उस्मानाबाद जिल्ह्यातील कांही गावाच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी १९७१ साली मंजुर करण्यात आलेल्या या मांजरा धरणात या वर्षीच्या सुरुवातीपासुनच पावसाने दडी मारली असून जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत तरी दमदार पावूस झाला नसल्याने मांजरा धरणातील पाणी पातळी सातत्याने खाली जात आहे. २३४.०९३ दलघमी पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असलेल्या या धरणात १७ जुलै अखेर फक्त ८७.५८६ दलघमी पाणी साठा जमा झाला आहे. मांजरा धरणाच्या एकुण पाणी साठवण क्षमतेच्या तुलनेत हा साठा फक्त २२.८६ टक्के इतका असल्यामुळे तो खुप कमी वाटत असून सध्या हा पाणीसाठा धरणाच्या जोत्याच्या पातळीपेक्षाही कमी आहे.
यावर्षी मृग नक्षत्रानंतरची दोन नक्षत्र उलटुन गेली तरी पावसाने सर्वदुर आपली हजेरी लावली नसल्यामुळे या विभागातील पेरण्यांना जुलै महिन्यापर्यंत वाट पहावी लागली.


जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणीयोग्य पावूस झाल्यानंतर या विभागातील पेरण्या झाल्या आहेत. पेरणीनंतर आता पावूस सतत हजेरी लावत असल्यामुळे या विभागातील सोयाबीन व इतर पीकांना थोडा दिलासा मिळत आहे. मात्र जमिनीतील पाणी पातळी वाढण्यायोग्य अजूनही दमदार पाऊस या विभागात झाला नाही. पिकांना जीवदान देण्यासाठी योग्य वेळी योग्य प्रमाणात पावूस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता थोडे समाधान दिसत आहे.
पावूस सुरु झाला की, शेतातील पीकासोबतच पीण्याच्या पाण्याचीही चिंता या विभागातील शेतकऱ्यांसह सामान्य लोकांच्या चेहऱ्यावर दिसत असते. यावर्षी सुरुवाती पासुन आज पर्यंत पावसाने हुलकावणी लावली असल्यामुळे शेती सोबतच पीण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होईल का असे वाटत होते. मात्र जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पावसास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकरी व सामान्य माणूस ही सुखावला असल्याचे दिसून येत आहे.