मांजरा धरणाच्या २९ कोटींच्या कामाची निविदा निघाली; २वर्षात अधुनिकिकरण


आ. नमिता मुंदडा यांची माहिती
मांजरा धरणाची गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली कामे पुर्ण करण्यासाठी व मांजरा धरणाच्या आधुनिकीकरणाच्या २९ कोटी रुपयांच्या कामाची निविदा राज्यशासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने काढण्यात आली असून निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर वर्षभरातच ही सर्व कामे पुर्ण होतील अशी माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली आहे.


२००२ नंतर पहिल्यांदाच मोठ्याप्रमाणावर दुरुस्ती
४५ वर्षापुर्वी निर्मिती करण्यात आलेल्या मांजरा धरणाची डागडुजी २००२ नंतर प्रथमच यावर्षी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दरम्यानच्या काळात मांजरा धरणावरील सर्व यंत्रणेत मोठ्या प्रमाणावर बिघाड निर्माण झाला होता. मांजरा धरणाच्या एकुण १६ दरवाज्यांपैकी अनेक दरवाज्यातुन मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत होती तर मांजरा डावा कालवा व उजवा कालव्याचे दरवाजे उघडण्यास ही अडचणी निर्माण होत्या.


दोन्ही कालव्याचे गेट ही होणार दुरुस्त!
या दोन्ही कालव्याच्या तोंडाशी मोठ्या प्रमाणावर गाळ निर्माण झाला आहे. मांजरा धरणाच्या लोखंडी दरवाजांची उंची वाढवण्यात आल्यानंतर धरणाच्या मातीच्या भिंती ची ही उंची वाढवणे आवश्यक होते मात्र गेली अनेक वर्षांपासून या सर्व कामांसाठी आवश्यक तेवढा निधी मिळाला नसल्यामुळे ही सर्व कामे प्रलंबित होती.


आ. नमिता मुंदडा यांच्या पाठपुरावा
या सर्व कामांसाठी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी आपण स्वतः खा. डॉ. प्रितम मुंडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांच्या मार्फत राज्य आणि केंद्र शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला असल्यामुळे केंद्र शासनाच्या देशातील जुन्या मोठ्या धरणांच्या आधुनिकीकरणासाठी सुरू केलेल्या योजनेतील दुसऱ्या टप्प्यात हा २९ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली.
पाटबंधारे विभागाने काढली निविदा
मांजरा धरणाच्या आधुनिकीकरणाच्या कामासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या या २९ कोटींची कामे सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्या गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग लातुर या कार्यालयाच्या वतीने २०५४.४४ लक्ष रुपयांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झाली असून या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येईल अशी माहिती आ. नमिता मुंदडा यांनी दिली आहे.