भारत जोडो यात्रेत महाराष्ट्राचा माजी मंत्री जखमी; डोळ्याला लागला मार!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/nitio_in_raut.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2022/11/nitio_in_raut.jpg)
Bharat Jodo Yatra Latest Update : राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या पक्ष मजबूत करण्यासाठी भारत जोडो यात्रा करत आहेत. सध्या तेलंगणात भारत जोडी यात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. या दौऱ्यात राहुल गांधी दररोज वेगवेगळ्या समुदायातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेताहेत.
दरम्यान, भारत जोडो यात्रेत हैदराबाद (Hyderabad) इथं सहभागी झाले असताना माजी मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना कुणाचा तरी धक्का लागला आणि तोल जाऊन ते खाली कोसळले. यामुळं त्यांचा डावा डोळा जखमी झाला असून, त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथील इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालत असताना कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी होती. या गर्दीतून मार्ग काढत प्रत्येक जण पुढं जाण्याचा प्रयत्न करीत होते. अशाच प्रयत्नात कुणाचा तरी राऊत यांना धक्का लागला आणि ते खाली कोसळले.
यानंतर ट्विट करुन दीक्षा नितीन राऊत (Deeksha Nitin Raut) यांनी याबाबतची माहिती दिलीय. दीक्षा राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, काल (मंगळवार) हैदराबादमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान माझे वडील बेशुद्ध झाले आणि खाली कोसळले. त्यांच्या डोक्याला छोटीशी जखम झालीय. मला आशा आहे की, ते लवकरच बरे होतील आणि महाराष्ट्रात पोहोचल्यावर ते जनआंदोलनात देखील सामील होतील, असं त्यांनी नमूद केलंय.