भारत जोडतो यात्रेत कोल्हापुरचे हजारो फेटेधारी दाखल; मैदानी खेळांचे ही केले प्रशिक्षण!


कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये शनिवारी (ता. १२) कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. भगव्या फेट्यांसह रस्त्यावरील दुतर्फा रांग असो कि, आखाडा बाळापुरमध्ये लाल मातीत रंगलेला कुस्त्यांचा फड असो.
पारंपारिक खेळांनी वेधले लक्ष
कोल्हापुरकरांनी हिंगोलीत जाऊन केलेले स्वागत ‘नाद’ खुळा असेच होते. अर्थातच, आजच्या दिवसाचे केंद्रबिंदू हाच प्रसंग ठरला. यावेळी शिवकालीन पारंपरिक खेळांनीही लक्ष वेधले.
भारत जोडो यात्रेच्या ६६ व्या दिवशी कळमनुरी तालुक्यातील दाती पाटी येथून यात्रा सुरु झाली. तासभराने यात्रा जेव्हा आखाडा बाळापुर याठिकाणी पोचली, तेव्हा खा. राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी सहाशे किलोमीटर दुरवरुन आलेल्या कोल्हापूर येथील तब्बल पाच हजार कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.
भल्या पहाटेच भेटेधारी पदयात्रींकडुन स्वागत!
शनिवारी पहाटे साडेपाच वाजताच ते स्वागतस्थळी येऊन थांबले होते. पदयात्रेत राहुल गांधी यांचे लक्ष कुस्तीच्या आखाड्याकडे गेल्यावर, सहाजिकच त्यांची पावले तिकडे वळली. झेड प्लस सुरक्षा व्यवस्था भेदून त्यांनी कोल्हापुरहून आलेल्या मल्लांना भेटले. राहुल गांधी यांच्या हस्ते एक कुस्ती लावण्यात आली. पैलवानांनीदेखील शड्डू ठोकत सुरवात केली. यावेळी कुस्तीतला प्रत्येक डाव ते निरखून पाहिला. त्यांच्या निरीक्षणाचेही कोल्हापूरकरांना अप्रुप वाटले. अडीच मिनीटांपेक्षा अधिक वेळ त्यांनी दिला.
खा. राहुल गांधी यांच्यासोबत कोल्हापुरकर आठ ते दहा किलोमीटर पदयात्रेत चालले. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील, राजीव आवळे, ऋतुराज पाटील, पलुस कडेगावचे आमदार विश्वजीत कदम, आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांनी यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रेत भाग घेत चर्चा केली