बॉम म्युझिक स्कुल ही राज्यातील एकमेव अत्याधुनिक म्युझिक स्कुल
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240304_211931222896759458854746-1024x437.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240304_211931222896759458854746-1024x437.jpg)
संगीतकार प्रकाश बोरगांवकर यांचे मत
बॉम म्युझिक स्कुल राज्यातील एकमेव पश्चिमात्य आणि पारंपरिक संगीत वाद्याचे प्रशिक्षण देणारी अत्याधुनिक म्युझिक स्कुल आहे असे मत संगीतकार गायक प्रकाश बोरगांवकर यांनी व्यक्त केले.
प्रख्यात संगीतकार एक.. आर. रहेमान यांच्या इंटरनॅशनल म्युझिक स्कुल मध्ये संगीताचे उच्च शिक्षण घेऊन अंबाजोगाई शहरात दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या बॉम म्युझिक स्कुल च्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रकाश बोरगांवकर बोलत होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240304_2119569063936759238853847-1024x547.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240304_2119569063936759238853847-1024x547.jpg)
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा व्याख्याते अभिजित जोंधळे हे उपस्थित होते. व्यासपीठावर संगीतकार ओंकार रापतवार, प्रख्यात गायिका भैरवी पाटील, कल्पना रापतवार,पद्मनाभ देशपांडे, बालासाहेब गायके, तुकाराम सुवर्णकार, किरण कदम व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240304_2135456770406879060374318-1024x700.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240304_2135456770406879060374318-1024x700.jpg)
येथील नगर परिषदेच्या विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना प्रकाश बोरगांवकर पुढे म्हणाले की, अंबाजोगाई शहराला मोठी सांस्कृतिक आणि सांगतिक परंपरा लाभली आहे. ही परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न आजच्या तरुण पिढीतील युवा संगीतकार ओंकार रापतवार करीत आहे ही गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. मी महाराष्ट्रातील अनेक शहरातील सांगितीक कार्यक्रमांना हजेरी लावतो. यावेळी मी त्या त्या शहरातील संगीत शाळांनाही भेटी देतो. मात्र माझ्या दृष्टिपथात आजपर्यंत तरी पश्चिमात्य आणि पारंपरिक संगीताचे एकत्र शिक्षण देणारी संगीत शाळा आढळून आली नाही. मात्र अंबाजोगाई शहरात राहून आपले संगीत करीयर अत्यंत चांगल्या पध्दतीने झेपावत असतांनाच ओंकार रापतवार याने बॉम म्युझिक स्कुल च्या माध्यमातून हे केलेले धाडस निश्चित कौतुकास्पद आहे असे सांगून बॉम म्युझिक स्कूल च्या सर्व उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240304_2119107133638901185509141-1024x557.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240304_2119107133638901185509141-1024x557.jpg)
प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले प्रख्यात व्याख्याते अभिजित जोंधळे यांनी आपल्या भाषणात ओंकार रापतवार यांच्या आज पर्यंतच्या संपूर्ण सांगितिक प्रवासाचा एक डोळस साक्षीदार असल्याचे सांगत घरात कसल्याही प्रकारचा सांगतिक वारसा नसताना संगीत क्षेत्रातच आपले करियर करण्याचा निर्णय घेवून त्या क्षेत्रातील एक तरुण संगीतकार होई पर्यन्तचा हा सगळा प्रवास निश्चितच कौतुकास्पद असून इतर तरुणांना प्रेरणा देणारा आहे.
ओंकार रापतवार यांने बॉम म्युझिक स्कूल आणि बॉम म्युझिक स्टुडिओ अंबाजोगाई शहरात सुरु करुन शहराच्या सांगतिक परंपरेत एक भक्कम असे कार्य केले असून त्यांच्या या सर्व उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240304_2120172546868977586149847-1024x599.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2024/03/img_20240304_2120172546868977586149847-1024x599.jpg)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बॉम म्युझिक स्कूल आणि बॉम म्युझिक स्टुडिओ चे संचालक ओंकार रापतवार यांनी केले. या कार्यक्रमात बॉम म्युझिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी आपला सांगीतिक आणि गायनाचा परफॉर्मन्स सादर केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बॉम म्युझिक स्कुल चे भाग्यश्री महाजन, राहुल परदेशी आणि बॉम म्युझिक स्कुल च्या सर्व सहकारी मित्रांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी बॉम म्युझिक स्कुल चे सर्व विद्यार्थी, पालक व शहरातील संगीतप्रेमी उपस्थित होते.