“फूट क्लिनीक” च्या माध्यमातून २४ बालकांची दिव्यांगापासून मुक्ती!


रोटरी, क्युअर इंडिया आणि स्वाराती चा उपक्रम!
अंबाजोगाई रोटरी क्लब, क्युअर इंडिया आणि स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणा-या “फूट क्लिनीक” या उपक्रमाच्या माध्यमातून २४ बालकांची दिव्यांगापासून मुक्ती करण्यात आली अशी माहिती रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई चे माजी अध्यक्ष मोइन शेख यांनी दिली आहे.
या संदर्भात त्यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट शेअर केली असून सदरील पोस्ट मध्ये असे म्हटले आहे की, “एखाद्याच्या जीवनात आनंद देऊन त्याच आयुष्य उज्वल करून देण्यात जर तुमचा खारीचा वाटा असेल ना तर तेच खरं पुण्य म्हणायचं! रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, क्युअर इंडिया आणि स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या “फूट क्लिनिक” ला आज पूर्ण एक वर्ष झाले. मी स्वतः रोटरी क्लबचा अध्यक्ष आणि माझे मित्र भीमाशंकर शिंदे सचिव असताना या क्लब फूट क्लिनिकची सुरुवात करण्यात आली होती.


हे क्लिनिक म्हणजे जन्मजात बालकांना जे अपंगत्व आलेलं असेल तर त्यांच ते अपंगत्व 100% बर करण्यासाठी या क्लिनिक ची सुरुवात केली होती.
बघता बघता आज या फूट क्लिनीक ला चक्क एक वर्ष पूर्ण झाले. मागील 1 वर्षात ज्या मुलांचे पाय पूर्णपणे वाकडी होती ज्यांना चालणं शक्य न्हवते अशी 24 बालके या फूट क्लिनीक घ्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपचाराने पुर्णतः 100% बरी झाली. आज ते आपल्या पायावरती चालू शकतात! यापेक्षा दुसरे समाधान ते काय !


हा उपक्रम आज रोटरीचे विद्यमान अध्यक्ष स्वप्निल परदेशी व सचिव गणेश राऊत यांनीही अतिशय संवेदनशील मनाने पुढे चालू ठेवला आहे. त्यांचे आभार माणण्याचा औपचारिक पणा इथे करीत नाही. आम्ही चालू केलेल्या या “फूट क्लिनीक” प्रोजेक्टला सर्वांचेच खुप सहकार्य लाभत आहे.
आपण कष्ट कुणासाठी करतो, तर आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी. आपल्या लेकरांसाठी ते पुरून जे उरेल त्यातून थोडासा हिस्सा आम्ही सर्व रोटरी सदस्य समाजातील गोर गरीब जे गरजवंत आहेत अश्या लोकांना मदत म्हणून आम्ही आमच्या परीने करत आहोत. आज या कार्यक्रमात आलेल्या चिमुकल्या लेकरांना पाहून मनाला समाधान वाटल की आपण केलेला काम सार्थक ठरला आहे.”
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी झटणाऱ्या सर्व हातांना सला