Uncategorizedमंदिरांचे गावं

प्रति गाणगापूर; अंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई


श्री दत्त जयंती निमित्त  मंदिर कमिटीने जन्मोत्सव सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करावे.
‐‐——‐——————————————————
गाणगापुर, नरसोबाचीवाडी,कुरवपुर, आणि गिरणार पर्वता ऐवढे महात्म्ये असलेली ;परळी ची अंबा आरोग्य भवानी! भगवान दत्तात्रेय भगवान यांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे वास्तव्याने पुनित झालेले तिर्थ क्षेत्र .या तिर्थक्षेत्रांचे दत्त जयंती निमित्त परळी वैद्यनाथ पंचक्रोशीचे अभ्यासक गोपाळ आंधळे यांच्या लेखणीतून महत्व विषद करणारा लेख वाचकांसाठी देत आहोत.
        बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक परळी चे प्रभू वैद्यनाथ व माता पार्वती एकञ वास्तव्याने पुनित असलेल्या परळी पंचक्रोशीत अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. त्या पैकी असेच एक धार्मिक स्थळ. नाथ संप्रदायाचे  दैवत भगवान दत्तात्रेय  यांचे सगुण रूपातील दुसरे अवतार परम पुज्य श्री स्वामी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गुप्त रूपाने तब्बल एक वर्षे वास्तव्य केलेले ठिकाण म्हणजे परळी पासुन चार कि.मी.अंतरावर चांदापूर गावाच्या पश्चिमेस असलेले अंबा आरोग्य भवानी (डोंगर तुकाई)मंदिर होय.

भगवान दत्तात्रेय यांचे सगुण रूपातील पहीले अवतार श्रीपाद श्री वल्लभ आणि दुसरे अवतार (गाणगापुर निवासी ) श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज या स्वामी महाराजांचे वास्तव्याने पुनित झालेले अंबा आरोग्य भवानी तिर्थ क्षेत्र ज्याचा उल्लेख नाथ पंथाच्या ग्रंथातील (पाचवा वेद) म्हणजे श्री गुरु चरिञ ग्रंथात अध्याय क्रमांक चौदा, पंधरा आणि सोळा या मध्ये सविस्तर महत्व विशद केले आहे.
*गुप्त रूपाने वास्तव्य करण्या मागचे कारण *
परम पुज्य श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या अलौकिक लिला आणि चमत्कारिक गोष्टी वार्या सारख्या लोकांपर्यंत पोहचत होत्या. त्यामुळे सत्पुरुष ,सामान्य भाविकां बरोबरच खलपुरूष, दुष्ट व्यक्ती सुद्धा महाराजांची महती ऐकुण आशिर्वाद घेऊन त्याचा दुरूपयोग करू लागले होते. म्हणून परळी वैद्यनाथ येथील अंबा आरोग्य भवानी येथे श्री स्वामी नरसिंह सरस्वती महाराज या ठिकाणी गुप्त रूपाने तब्बल ऐक वर्षे वास्तव्य केले.पुढे ते श्री शल्य पर्वतावर गेले असा उल्लेख गुरु चरिञ ग्रंथात आहे. तर सोबत असलेल्या सर्व (सिध्दांना)शिष्यांना काशी तिर्थ क्षेत्रात जाण्याची आज्ञा करून ते स्वतः या ठिकाणी गुप्त रूपाने राहीले.

*गुरु निंदा करणार्या ब्राह्मणास गुरु चे महत्व सांगितले *
अंबा आरोग्य भवानी तिर्थ क्षेत्रात वास्तव्यास आल्यावर परळी वैद्यनाथ येथील विद्याअर्जन दशेत असलेल्या एका ब्राम्हण शिष्याची भेट श्री स्वामी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्यासी झाली. त्या विद्यार्थ्यांने स्वामी कडे स्वतः ज्या गुरु कडे ज्ञान साधना करत होता, त्या गुरुंची निंदा करू लागला. माझे गुरू मला विद्या शिकविण्या ऐवजी इतरच कामे माझ्या कडून करून घेत आहेत. हे स्वामी नरसिंह सरस्वती महाराजांनी ऐकल्यावर त्या ब्राम्हण विद्यार्थ्यास गुरु ची महती सांगीतली. ऐका ऋषींच्या आश्रमातील तीन शिष्याची ऋषींनी घेतलेली वेगवेगळी परिक्षा याचे वर्णन श्री गुरु चरिञ ग्रंथातील अध्याय क्रमांक सोळा मध्ये विस्तृत वर्णन केले आहे.
भगवान दत्तात्रेय यांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या वास्तव्याने पुनित झालेले अंबा आरोग्य भवानी तिर्थ क्षेत्राचे महात्म्ये गाणगापुर, नरसोबाचीवाडी, कुरवपुर आणि गिरणार पर्वता ऐवढे महत्व आध्यात्मिक दृष्या परळी वैद्यनाथ येथील डोंगर तुकाई मंदिराचे आहे.

भुयारी गाभाऱ्यात पादुका मंदिर


डोंगर तुकाई मंदिर मुर्ती च्या डाव्या बाजूला ऐका वेळी एकच भावीक आत जाऊ शकेल अशा दगडी पायर्या असून आतमध्ये पाच बाय पाच असे गृभग्रह असून या ठिकाणी छोट्या पाषाणी शिवलिंगावर भगवान दत्तात्रेय यांच्या पादुका आहेत. ध्यान साधने साठी व अनुष्ठान करण्यासाठी हे ठिकाण खुप सुलभ आहे.
*तुकाई देवीची अख्यायिका *
अंबा आरोग्य भवानी (डोंगर तुकाई)देवीच्या दोन वेगवेगळ्या अख्यायिका सांगितल्या जातात. भवानी म्हणजे माता पार्वती होय. जेव्हा प्रभू रामचंद्र भगवान, माता सीता व बंधु लक्ष्मण वनवास काळात परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तिर्थ क्षेत्रात आले असता या डोंगरावर निवासा साठी थांबले असतांना ऐकपत्नी ख्याती असलेल्या प्रभू रामाची परिक्षा घेण्यासाठी माता पार्वती ने माता सीतेचे रूप घेऊन सीता माता दुसरी कडे गेल्याची संधी पाहुन त्या प्रभू रामचंद्रांच्या समोर आल्या. प्रभू रामचंद्रांनी आपल्या ज्ञान चंक्षुणी माता पार्वती चे मुळ स्वरुप ओळखले आणि आश्चर्याने मुखातून आपसुक निघाले, तु का आई पुढे हीच तुकाई माता झाली. कालांतराने डोंगरावर वास्तव्य असल्याने या ठिकाणास डोंगर तुकाई मंदिर म्हणून ओळख झाली.
दुसरी अख्यायिका अशी आहे. परळी वैद्यनाथ येथील आयाचित नावाचे ब्राम्हण हे तुळजापूर च्या भवानी देवीचे निस्सीम भक्त होते. ते आयुष्यभर तुळजापूर च्या देवीची वारी करत होते. परंतु शेवटी वार्धक्या मुळे पुढे वारी करूशकत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. भवानी माता त्यांच्या सेवेने प्रसन्न झाली.भवानी देवीने त्या ब्राम्हणास सांगीतले की, तुम्ही या पुढे तुळजापूर ला येण्याची गरज नाही मीच तुमच्या सोबत तुमच्या घरी येणार आहे. माझी अट ऐकच आहे. तुम्ही पुढे चालत रहा. मागे वळून पाहिचे नाही. त्या प्रमाणे हे चालत डोंगर तुकाई डोंगरा पर्यंत आले. परंतु देवीच्या पायातील खडावाचा आवाज बंद झाल्यामुळे त्या ब्राम्हणाने मागे वळून पाहिले. त्याच क्षणी देवी त्याच क्षणी मुर्ती रूपाने तेथेच विराजमान झाली.

  • प्रभू वैद्यनाथ मंदिर  विश्वस्त मंडळाने येथे भगवान दत्ताञ्येय जन्मोत्सव सोहळा साजरा करावा *
    श्री क्षेत्र माहुर, गाणगापुर, पीठापूर, नरसोबाची वाडी, कुरवपुर या ठिकाणा ऐवढेच धार्मिक महत्त्व असलेले हे परळी वैद्यनाथ चे प्रती गाणगापुर अंबा आरोग्य भवानी डोंगर तुकाई ठिकाण आहे. या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यातील पोर्णिमेला भगवान दत्ताञ्येय यांची जयंती असते. येणार्या ७ डिसेंबर २०२२ रोजी ही दत्त जयंती आहे. त्या निमित्त वैद्यनाथ मंदिर ट्रस्ट ने जन्मोत्सव सोहळा आणि महाप्रसादाचे आयोजन करावे. अशी भावीकांची अनेक वर्षांपासून ची मागणी आहे. या वर्षी पासून तरी हा जन्मोत्सव सोहळा साजरा करावा.
    त्याच बरोबर तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत मंजूर असलेल्या निधी तून या तिर्थक्षेत्राचा विकास व्हावा.
    धन्यवाद.
  • गोपाळ रावसाहेब  आंधळे
    परळी वैद्यनाथ
    9823335439

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker