प्रख्यात ग्रामीण पत्रकार तथा साहित्यिक त्रिंबक असरडोहकर यांच्या पत्नी श्रीमती विद्या ताई देशमुख (८२) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. आडस येथील लोकमत च्या पत्रकार किरण देशमुख व सौ. रेखा देशमुख व चंद्रशेखर देशमुख यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्रिंबक असडोहकर यांच्या निधनानंतर श्रीमती विद्या ताई देशमुख यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपल्या तीन ही लहान मुलांचा सांभाळ करीत त्यांना चांगले शिक्षण दिले. स्वतः घ्या पायावर त्यांना उभे करणे पर्यंत सतत कष्ट सहन केले.
त्यांची मोठी मुलगी सौ. रेखा देशमुख या होळ येथील बनेश्वर माध्यमिक विद्यालयात ग्रंथपाल म्हणून तर लहान मुलगी सौ. किरण ही आडस येथील लोकमत च्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत तर मुलगा हा अभियांत्रिकीची पदवी घेवून स्वतः खाजगी कंपनी चालवत आपला उद्योग सांभाळत आहे.
श्रीमती विद्या ताई देशमुख यांना मागील काही वर्षांपासून दमा आणि -हददयविकाराचा सतत त्रास होत असत. येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिसीन विभाग प्रमुख डॉ सिध्देश्वर बिराजदार सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचेवर अनेक वर्षांपासून उपचार सुरू होते. मागील काही दिवसांपासून त्यांना याच आजारामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी आज पहाटे अखेरचा श्वास घेतला.
एक मनमिळाऊ, शांत सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका सतत निभावणा-या विद्या ताई देशमुख यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.