नियमित प्रमाणे परळीत आल्यानंतर आज राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी परळी येथील आपल्या जगमित्र या कार्यालयामध्ये बसून मतदारसंघातून व मतदारसंघ बाहेरून आलेल्या नागरिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी यांच्याशी संवाद साधत त्यांची कामे अडचणी समजून घेतल्या तसेच ती मार्गी लावण्याबाबत संबंधितांना योग्य त्या सूचना देत संबंधितांची कामे मार्गी लावली.
नागरीकांच्या गर्दीने कार्यालय गजबजले
जागच्याजागीच काम मार्गी लावण्याचा शैलीमुळे ना. धनंजय मुंडे यांच्या जनता संवाद उपक्रमास नेहमीच गजबजलेली गर्दी पाहायला मिळते. आजही धनंजय मुंडे जगमित्र कार्यालयात दाखल झाल्यानंतर पदाधिकारी कार्यकर्ते त्याचबरोबर परळी व परळी बाहेरील नागरिकांनी जगमित्र हे धनंजय मुंडे यांचे कार्यालय गजबजलेले पाहायला मिळाले.
प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेवून केली सुरुवात!
मंत्री धनंजय मुंडे हे परळीत असल्यानंतर नियमित प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनाला जातात. आजही घराबाहेर पडतात त्यांनी सर्वप्रथम बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे मनोभावे दर्शन करून विधिवत पूजन केले व त्यानंतर ते जनता संवाद उपक्रमासाठी त्यांच्या जगमित्र या कार्यालयात दाखल झाले.
महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.