महाराष्ट्र

नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ तासात २४ मृत्यू!

१२ नवजात बालकांचा समावेश


नांदेड • संतोष कुलकर्णी


मुख्यमंत्र्याच्या ठाण्यामधील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दोन महिन्या पूर्वी रुग्णांचा उपचाराअभावी तडफडून रुग्णालयात मृत्यू झाला होता. असाच काहीसा प्रकार डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये 24 जणांचा 24 तासांमध्ये मृत्यू झाल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. मृत्यू पावलेल्यांमध्ये बारा नवजात अर्भकांचा समावेश आहे त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच खळबळ उडाली आहे. या 24 जणांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला आहे हे अद्यापही समजू शकलेले नाही.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस आलेल्या सलग तीन सुट्ट्या, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्या, सुट्ट्यावर असणारे कर्मचारी, ड्युटीवर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची अनियमितता, अस्वच्छता, रुग्णसेवेमधील हेळसांड या सर्व कारणांचा हा परिपाक असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून समजते. रुग्णांना या रुग्णालयामध्ये दाखल करून घेताना रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी सुद्धा मोठ्या प्रमाणावर येत आहेत.

या रुग्णालयाला औषधांचा पुरवठा करणाऱ्या हाफकिन या कंपनीने औषधांचा पुरवठा काही कारणामुळे बंद केला आहे त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून महागडी औषधी विकत घेऊन उपचार करावा लागत असल्याचेही समजते. प्रशासनाचा सावळागोंधळ या ठिकाणी असल्यामुळे कोणाचा ताळमेळ कोणालाही लागत नाही त्यामुळे रुग्णांची हेडसांड मोठ्या प्रमाणावर होत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. एका वर्षापूर्वी एका रुग्णाचा रुग्णालयाच्या बाहेरच बेवारस अवस्थेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याचीही घटना घडली होती. या घटनेची चौकशी अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याचे समजते. आज मृत्यू पावलेल्या बारा नवजात अर्भकांपैकी सहा पुरुष व सहा स्त्री अर्भकांचा समावेश असल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रुग्ण दगावल्याची बातमी खरी असून ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे झाली आहे याचा आम्ही शोध घेत आहोत. असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. सर्पदंश व गंभीर विषबाधा झालेल्या रुग्णांच्या उपचारांमध्ये पुरेशी औषधे नसल्यामुळे या ठिकाणी उपचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले आहे. सर्पदंश व विषबाधा झालेल्या लग्नाच्या नातेवाईकांना रुग्णालयाच्या बाहेर असणाऱ्या बड्या पुढार्‍यांच्या मेडिकल शॉप मधून महागडी औषधे विकत घ्यावी लागत असल्याचीही माहिती अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.

या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे व बाहेरील मेडिकलच्या शॉपी असणाऱ्या चालकांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे अनेक औषधांचा कृत्रिम तुटवडा असल्याचे भासवले जात आहे. नांदेड मधील शासकीय रुग्णालयात शंभर किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावरून मोठ्या प्रमाणावर रुग्ण येत असून शेजारच्या तेलंगणा राज्यातूनही तसेच विदर्भातून अनेक रुग्ण या ठिकाणी उपचारासाठी येत असतात. आज मृत्युमुखी पडलेल्या बारा अर्भका व्यतिरिक्त इतर 12 रुग्ण जे दगावले आहेत त्यांना सर्पदंश किंवा गंभीर विषबाधा झाली होती असे समजते. या ठिकाणी मराठवाड्यातून, विदर्भातून किंवा तेलंगणातून येणारे अनेक रुग्ण हे गंभीर अवस्थेमध्ये येत असतात. या ठिकाणी होणारी रुग्णांची हेळसांड व कर्मचाऱ्यांचा तुटवडा, रुग्णालय प्रशासन देत असणारी अपुरी व्यवस्था यामुळे अनेक रुग्णांना उपचारा भावी तडफडून मरावे लागत असल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker