दैनंदिन न्यायालयीन कामकाजात आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांच्या आरोग्य तपासणीची आवश्यकता


जिल्हा सत्र न्या. डी. डी. खोचे यांचे मत
दैनंदिन न्यायालयीन कामकाजाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आणि वकील मंडळींची वारंवार आरोग्य तपासणी होण्याची आवश्यकता आहे असे मत अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. डी. डी. खोचे यांनी व्यक्त केले.
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभाग आणि अंबाजोगाई वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या वकील संघात आयोजित करण्यात आलेल्या स्थुलपणा निवारण व उपचार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मा. न्या. डी. डी. खोचे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे तर प्रमुख अतिथी म्हणून मा. संजश्री घरत मॅडम जिल्हा व सत्र न्यायाधीश अंबाजोगाई, मा. व्ही. के. मांडे जिल्हा व सत्र न्यायाधीश,अंबाजोगाई, मा. एम. वाय. वाघ साहेब दिवाणी न्यायाधीश,वरिष्ठ स्तर अंबाजोगाई, मा. झेड. झेड. खान साहेब दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर अंबाजोगाई, मा. एन. सी.बोरफळकर साहेब दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर अंबाजोगाई, मा. एस. डी. मेहता साहेब दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर अंबाजोगाई, मा. बी. एन. गोडबोले साहेब दिवाणी न्यायाधीश,कनिष्ठ स्तर अंबाजोगाई, अँड.अशोक कवडे, अध्यक्ष वकील संघ,अंबाजोगाई, अँड. शिवाजी केंद्रे, उपाध्यक्ष वकील संघ,अंबाजोगाई हे मान्यवर उपस्थित होते.
आपल्या विस्तारीत भाषणात न्या. डी. डी. खोचे पुढे म्हणाले की, तन,मन आणि धन यांची सांगड घालण्यासाठी सुदृढ शरीराची आवश्यकता असते. सुदृढ मनाची काळजी घ्यावयाची असेल तर मनाची आराधना करावी लागते. सुदृढ मनाची काळजी घ्यावयाची असेल तर मनाची काळजी घ्यावी लागते आणि सुदढ तन आणि मन यांची काळजी घ्यावयाची असेल तर शरीर सुदृढ असायला हवे असे सांगत दैनंदिन न्यायालयीन कामकाजाच्या व्यापामुळे न्यायालयीन कर्मचारी आणि वकील मंडळी ही आपल्या शरीराची आवश्यक तेवढी काळजी घेत असल्याचे दिसून येत नाहीत. त्यामुळे न्यायालयीन कर्मचारी आणि वकील मंडळींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्थुलपणा निवारण व उपचार शिबीर या आरोग्य कॅम्प आयोजित करण्यात आल्याबद्दल सर्व प्रथम आपण या सर्व टीमचे ऋण व्यक्त करतो असे सांगत वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने किमान दोन महिन्यांतुन एकदा विविध आजारांची माहिती देणारी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात यावीत व या कर्मचारी व वकील मंडळींच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये संचालनालयाने अलिकडील कांहीं दिवसांत आपली भुमिका बदलली असून पुर्वी केवळ वैद्यकीय शिक्षण व रुग्ण सेवा करण्याचे काम करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना आता समाजातील विविध घटकांत जावून विविध आजारांची माहिती देणारी आरोग्य शिबिरांचे आयोजन करुन त्या आजारांची सखोल माहिती देणे व उपचार करणे असा बदल केला आहे. राज्य शासनाच्या या बदललेल्या भुमिकेनुसार स्थुलपणा निवारण आणि उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असून या आरोग्य शिबिरात सहभागी होणा-या प्रत्येकाची उंची, वजन, रक्तदाब, रक्तशुगर यांची तपासणी करून प्रत्येकाचा बॉडी माक्स इंडेक्स करुन आवश्यकतेनुसार उपचार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या उदघाटनीय भाषणात मा. न्या . डी. डी. खोचे यांनी अपेक्षा व्यक्त केल्याप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने प्रति दोन महिन्यांतुन एकदा न्यायालयीन कर्मचारी व वकील मंडळी साठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येईल अशी ग्वाही ही अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी दिली.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला वकील संघाचे अध्यक्ष ऍड. अशोक कवडे यांनी स्थुलपणा निवारण व उपचार शिबिराच्या आयोजनामागील वकील संघ आणि स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय यांची संयुक्त भुमिका विषद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वकील संघाचे सचिव ऍड.मनजित सुगरे यांनी केले तर सहसचिव ऍड. विकास भुरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वकील संघाचे लिपीक सिध्देश्वर स्वामी व वकील संघाचे सदस्यांनी प्रयत्न केले.
डॉक्टर व कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग
स्थुलपणा निवारण व उपचार शिबिरात तपासणी साठी १६ डॉक्टर, परिचारीका व इतर कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये डॉ. रमेश इंगळे, डॉ. किरण राहीगुडे, डॉ. ओंकार जाधव, डॉ. पुजा गीत्ते,
डॉ. मृणाली डोंगरे, डॉ. किरण कोपले,
डॉ. किरण परसे, डॉ . अजय थोरात, डॉ. योगेश दळवी, डॉ. अशीश लोमटे, डॉ. विजय बागडे, डॉ. रवि मोरे, डॉ. गणेश कोकरे, डॉ. तक्षशिला, शुभम चव्हाण यांच्या सह प्रशिक्षित परिचारीका, कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.
१५० जणांची स्थुलपणा ची तपासणी. डॉ. बिराजदार यांची माहिती


या शिबिरात अंबाजोगाई येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, दिवाणी न्यायालय वरीष्ठ स्तर, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर येथे कार्यरत असलेले सन्माननीय न्यायाधीश, कर्मचारी, वकील संघाचे सदस्य असे एकुण १५० च्या वर नागरिकांची तपासणी करण्यात येवून समुपदेशन करण्यात आले असल्याची माहिती स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभाग प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार यांनी दिली.