ठळक बातम्या

तैलचित्र अनावरण प्रसंगी पंकजा मुंडे यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा


भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांच्या निवासस्थानी स्व.गोपीनाथराव मुंडे प्रतिमाचा शानदार सोहळा पंकजाताई यांच्या शुभहस्ते पार पडला. औपचारिक कार्यक्रमात बोलताना त्यांनी मुंडे साहेबांच्या आठवणीला उजाळा दिला.

सामान्य जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य समर्पित करताना साहेबांनी दिलेले संस्कार डोळ्यांसमोर ठेवुन आपली वाटचाल सुरू आहे. संकटात संघर्ष आणि संयम हे आपण साहेबाकडून शिकलो हे सांगताना दु:ख अजुनही समोर आहे. पण रडायचं नाही तर जीवापाड प्रेम करणार्‍या कार्यकर्त्यासाठी जगायचे असे म्हणत पंकजाताईने या सोहळ्याचे कौतुक करताना कार्यक्रम कुठला ही असो तो साजरा कसा करावा ? हे रामभाऊकडून शिकण्यासारखं असल्याचे त्या म्हणाल्या. स्व.गोपीनाथ मुंडे साहेबांची प्रतिमा अत्याधुनिक डिजिटल बॉक्समध्ये अनावरण करण्यासाठी स्वत: पंकजाताई राम कुलकर्णी यांच्या निवासस्थानी आल्या होत्या. शानदार सोहळ्यात अनावरण झाल्यानंतर औपचारिक कार्यक्रमही घेण्यात आला.

संतोष मानुरकर, अजित वरपे व इतरांचा सत्कार

सुरूवातीला माजी आ.आर.टी.देशमुख, जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अजित वरपे, संतोष मानूरकर, ठाकुर उदयसिंह दिख्खत, रामप्रभु मुंडे, बाळासाहेब बडे, सोमनाथ बडे आदी मान्यवरांचा सत्कार प्रा.एस.पी.कुलकर्णी, कल्याण यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रामभाऊ यांनी 1988 पासूनचे साहेबासोबत असलेले अनेक प्रसंग सांगुन हे आमचं दैवत असुन पितृतुल्य साहेबांची सेवा मला तब्बल 30 वर्षे पायाजवळ बसून हनुमान सेवा करण्याचे भाग्य मिळाले हे माझे फार मोठे पुण्य असल्याचे ते म्हणाले. जेव्हा मी शिक्षणासाठी अंबाजोगाईत हाताने स्वयंपाक करायचो ती भाकरी साहेबांनी माझ्या किरायाच्या रूमवर येवून जेवण केल्याचा ही प्रसंग त्यांनी सांगितला.

माजी आ.आर.टी.देशमुख यांनी देखील आपल्या आयुष्यात साहेबांचे आगळेवेगळे स्थान असून अनेक प्रसंग त्यांनी सांगितले. आजही डोळ्यांसमोरून साहेब जात नाहीत. त्यांच्यानंतर पंकजाताई यांना साहेब म्हणत मी आत्मसमाधान घेण्यास सुरूवात केली. ताईसाहेबांत मला साहेब दिसतात हे सांगताना माझ्या राजकिय आयुष्यात ताईसाहेबांनी दिलेला शब्द पुर्ण केला. आयुष्य आता त्यांच्या पाठीमागे समर्पित करून जगण्याचा संकल्प त्यांनी बोलून दाखविला.

यावेळी बोलताना पंकजाताई यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करून साहेबांच्या अनेक आठवणींना उपस्थितांच्या समोर उजाळा दिला. राजकारण कसे करावे ? संयम कसा बाळगावा ? जनकल्याणाची कामे कशी करावीत ? हे संस्कार आपल्याला साहेबांकडून मिळाले. बीड जिल्ह्याच्या जनतेची सेवा संधी असताना क्षणोक्षण समर्पित केलेला आहे. राजकारणातले चढ-उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. कार्यकर्त्यांनी संयम बाळगुन कार्य केले पाहिजे हा साहेबांचा आदर्श आपण सारे डोळ्यांसमोर ठेवून पुढे वाटचाल करत राहण्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

सायली कुलकर्णी हीने केले संचालन

कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन कु.सायली कुलकर्णी यांनी केले. यावेळी बीड रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी कल्याण कुलकर्णी यांची निवड झाल्याबद्दल पंकजाताईच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर ज्या आर्किटेक्टने अद्ययावत फर्निचरची बांधणी करून प्रतिमा बसविली दिनेश पुरी आणि मयुर इंटरप्रायजेसचे संचालक बाळासाहेब बडे यांचाही सत्कार पंकजाताईच्या शुभ हस्ते करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाला भाजपाचे तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, जेष्ठ नेते नारायण केंद्रे, कमलाकर कोपले, हिंदुलाल काकडे, गणेश कराड, महादेव फड, सचिन केंद्रे, महेश शेप, अनंतराव भोसले, दिलीप काळे, अनंत लोमटे, संजय गंभीरे, सुरेश कराड, शिवाजी गित्ते, डॉ.सुधीर धर्मपात्रे, डॉ.नितीन चाटे, शेख गफार (धारूर), लक्ष्मण शेटे, राहुल जामकर, श्रावणकुमार जाधव आदी मान्यवरांसह मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker