तीन आठवड्यापासून पावसाने फिरवली पाठ; शेतकऱ्यांमध्ये चिंता!
एलनिनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याचा हवामान खात्याचा अंदाज!
मागील तीन आठवड्यापासून या विभागात पावसाने पाठ फिरवली असून उशिरा पेरणी झालेली पीके आता उभी राहण्याऐवजी आपली मान खाली टाकून लागली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
यावर्षी या विभागात पावसाचे तसे उशीरा आगमन झाले. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येणारा पाऊस मृग नक्षत्र उलटुन दोन नक्षत्र येवून गेली तरी आलाच नाही. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कसातरी पेरणीयोग्य पाऊस पडला आणि शेतक-यांनी पेरण्या आटोपून घेतल्या.
पेरणीनंतर अधुन मधुन शिडकावा मारणारा पाऊस पडू लागल्यामुळे शेतकरी समाधानी दिसत होते, मात्र दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या पिकांची काळजी लागून राहिली आहे. मागील आठवड्यात पावसाने तट दिली असली तरी कशीतरी स्वाभिमानाने बोली लागलेली पीके मागील पंधरा दिवसांपासून पाऊस पडल्यामुळे आता आपल्या यांना खाली टाकून लागली आहेत. येत्या दोन दिवसांत सर्वदुर पाऊस झाला नाही तर पीके हातची जाण्यासारखी परिसरातील निर्माण झाली आहे.
यावर्षी जुलै महिन्यातील पहिल्या तीन आठवड्यात राज्यात पाऊस पडला नाही. परंतू शेवटच्या आठवड्यात बहूतांश ठिकाणी पाऊस पडला तसेच अनेक ठिकाणी ढगफुटी सुध्दा झाली आहे. यामुळे शहरात आणि अनेक गावात जनजीवन हे विस्कळीत झाले होते.
जुलै महिना संपल्या नंतर ऑगस्ट महिना सुरु होताच पावसाचा जोर कमी झाला. जाणंकरांच्या मते, ४ ऑगस्ट पर्यंत राज्यात तूरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. परंतू ४ ऑगस्ट पासून तर ९ ऑगस्ट पर्यंत बहूतांश भागात पावसाने उघडीप घेतली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडत आहे. जर एल निनोचा प्रभाव मॉन्सूनवर होत असेल तर भविष्यात दुष्काळ पडू शकतो का ? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात वारंवार येत आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या महितीनुसार, राज्यात १३ ऑगस्ट पासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल, कोकण भागात बहूतांश ठिकाणी पाऊस पडणार तसेच विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. १५ ऑगस्ट पासून सर्वदूर पाऊस पडणार, नवीन मॉन्सूनच्या पॅटर्न नुसार राज्यात कमी वेळेत अधिक पावसाच्या सरी बरसणार असल्याचे सांगितले जात आहे.