तिरुपती देवस्थानच्या ब्रम्होत्सवात अंबाजोगाईच्या जाहगीरदारांचा सन्मान


मोहन जहागिरदार यांना पुजेचा सन्मान!
अख्या जगाचे श्रध्दास्थान असलेल्या तिरुमला तिरुपती येथील बालाजी मंदीर देवस्थान येथे सध्या दसरा निमित्ताने ब्रम्होत्सव मोठ्या भक्तिभावाने सुरु आहे. याच उत्सवातील एका उपक्रमात अंबाजोगाई येथील बालाजी मंदिराचे विश्वस्त तथा पुजारी मोहनराव जहागिरदार यांना देवस्थानच्या वतीने सन्मानाच्या पुजेचे मानकरी म्हणून बोलावून सन्मान करण्यात आला.


अंबाजोगाई येथे ऐतिहासिक संदर्भ आणि महत्व असलेले सुमारे ४०० वर्षांपुर्वीचे बालाजी मंदिर आहे. रविवार पेठ विभागातील चार एकर जागेवर हे मंदीर पहरलेले आहे. या चार एकर जागेतील चार हजार स्क्वेअर फूट जागेत प्रशस्त असे बालाजी मंदिर आहे. या जुन्या मंदिरात. बालाजी च्या निस्सीम भक्त काशीबाई यांनी आपल्या शेवटच्या समयी बालाजी देवाचा धावा केला व मृत्यू येण्यापुर्वी एकदा तु लक्ष्मी आणि पद्मावती यांना घेऊन माझ्या घरी जेवायला ये, दर्शन दे अशी सतत विनवणी केली.


काशीबाईच्या विनंती ला बालाजी तेथे प्रकट झाले. काशीबाईच्या हातचे जेवण करून तिला आशीर्वाद दिला व सांगितले की, तु मला बोलावले. आता हेच थांब माझे कायमच ठिकाण राहील. या बालाजी मंदिरातील मूर्ती ही पद्मावती व लक्ष्मी सोबतच आहे.
या ऐतिहासिक मंदिराचे विश्वस्त व पुजारी म्हणून मोहन जाहगीरदार हे सध्या काम पहातात. याचमुळे तिरुमला तिरुपती येथील बालाजी मंदिरात सध्या सुरू असलेल्या ब्रम्होत्सवातील एका महत्त्वाच्या पुजेचे मानकरी म्हणून महाराष्ट्रातील फक्त दोन मान्यवरांना तिरुमला देवस्थान कडुन निमंत्रित करण्यात आले होते. या दोन मान्यवरांचे की मोहन जहागीरदार हे एक होते.


यावेळी मोहन जहागीरदार यांना या ब्रम्होत्सवातील या मानेच्या पुजेचा सन्मान, ब्रम्हध्वज घेऊन या रथ यात्रेच्या अग्रभागी चालण्याचा बहुमान, बालाजींचे आत गाभाऱ्यात जावून दर्शन, बालाजींच्या अंगावरील वस्त्र व ग्रंथ देवून सन्मान करण्यात आला. ब्रम्होत्सवातील या पुजेस मोहन जहागीरदार परिवारातील सदस्य, मित्र परिवार सहभागी झाला होता.