“ढोल-ताशा”च्या खणखणाटात अंबाजोगाईत शिवजयंती उत्साहात साजरी


हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अंबाजोगाई शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शहर आणि परिसरातील लोकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शहरातून निघालेली भव्य मिरवणूक व मिरवणुकीतील पारंपरिक लोककला, पारंपरिक वाद्य, तलवारबाजी, काठ्यांचा खेळ हे सर्व प्रकार शहरवासीयांसाठी आकर्षण ठरले.


प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवून ध्वजारोहण करण्यात आले,
यानंतर जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमावची सुरुवात करण्यात आली होती. ध्वजारोहण व मानवंदना या कार्यक्रमास दिनदयाळ बॅंकेच्या माजी अध्यक्षा सौ. शरयु हेबाळकर, शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील लोमटे,माजी आ.पृथ्वीराज साठे, पत्रकार शुभम खाडे, दिलीप आडसूळ, डॉ.नवनाथ घुगे, डॉ.श्रीनिवास रेड्डी, डॉ.राहूल धाकडे, मुस्लिम धर्मगुरू मारूक बाबा, शहर पोलिस निरीक्षक विनोद घोळवे, ऍड.किशोर गिरवलकर, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष मकरंद पत्की, माजी नगरसेवक कमलाकर कोपले, सुरेश कराड, अनंत लोमटे, बबन लोमटे, सुदर्शन काळे यांच्यासह सामाजिक राजकीय शिवभक्तांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.


शिवशाहीर मामा काळे व शहरातील स्थानिक कलावंताच्या शाहिरी पोवाड्यांनी आंगावरती शहारे उभा राहत होती.
शिवरायांचा अखंड गजर सुरू होता,दिमाखदार शिवजन्मोत्सव सोहळ्यात महाविद्यालयीन विद्यार्थींची, महीला भगिंनीं, युवकांची लक्षवेधी उपस्थिती होती. शहरातील काणाकोपऱ्यातुन हजारो शिवभक्त शिवजयंतीत सहभागी झाले होते, या मिरवणुकीत शिवभक्त, सामाजिक कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी, महीलांसह लहान मुलांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला.


मिरवणुकीचे मुख्य आकर्षण
घोडे, उंट, विविध ढोलपथक,हलगी पथक, शिवकालीन पारंपारिक दांडपट्टे पथक, वासुदेव,आराधी गोंधळी, वारकरी, बालकाच्या वेशातील, शिवबा जिजाऊ, शिवभक्तांचे लक्ष वेधून घेत होते.
शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला परीसर!
महीला पारंपारीक युद्ध कलेचा थरार हिंदु सांस्कृतित वासुदेव व वारकरी संप्रदायाला खुप महत्व आहे. अलिकडेच लुप्त होत असलेल्या अनेक ग्रामीण आणि पारंपारिक कला शिवजयंतीत पुन्हा पहायला मिळाल्या.