डॉ शरीफ देशमुख यांचा टॉप 2% मॅथमॅटिश एन म्हणून गौरव!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230725_153855-218x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230725_153855-218x300.jpg)
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे जन्मलेल्या आणि किंग सऊद युनिव्हर्सिटी रियाज येथे गणिताचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. डॉ. शरीफ देशमुख यांना सलग दुसऱ्यांदा ( 2021 2022 ) स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, यूएसए द्वारे जगातील प्रतिष्ठित “टॉप 2% गणिततज्ञांनी ” (Top 2% Mathematician) म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान मिळवणारे महाराष्ट्रातील ते एकमेव आणि भारतातील दुसरे गणित तज्ञांनी आहेत.
डॉ. शरीफ देशमुख हे मुळात रिसर्च सायंटिस्ट असल्याने त्यांच्या नावावर आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये १९० प्रकाशने आहेत. त्यांनी आज पर्यंत पीएच.डी. साठी ६ विद्यार्थ्यांचे पर्यवेक्षण केले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा या गावात जन्मलेल्या डॉ. शरीफ देशमुख यांनी हायस्कूलचे शिक्षण गावातच पूर्ण केले. मराठवाडा विद्यापीठ (आता BAMU) अंतर्गत औरंगाबाद येथील देवगिरी महाविद्यालयातून १९७२ मध्ये गणित विषयात बी.एस.सी. ऑनर्स ही पदवी मिळवली. नंतर विद्यापीठ टॉपर म्हणून मराठवाडा विद्यापीठातून (आता BAMU) १९७४ मध्ये गणित विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.
पदव्युत्तर पदवी मिळताच डॉ. शरीफ देशमुख हे अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. अंबाजोगाई येथे कार्यरत असतांनाच ते पी.एच.डी.ची पदवी मिळवण्यासाठी अलिगढ मुस्लिम विद्यापीठात दाखल झाले. पुढे त्यांनी अलिगढ विद्दालयातील प्राध्यापक म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
डॉ. शरीफ देशमुख यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अनेक शोधनिबंध सादर केले. जेथे त्यांना जगभरातील अनेक शीर्ष गणिततज्ञांनी म्हणून मान्यता देण्यात आली.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठात काही वर्षे सेवा केल्यानंतर डॉ . शरीफ देशमुख यांना १९८७ मध्ये जगातील प्रतिष्ठित किंग सऊद विद्यापीठात गणित विषय शिकवण्यासाठी सऊदी अरेबियात बोलावण्यात आले. तेंव्हापासून आजपर्यंत ते या विद्यापीठात संशोधन आणि विद्यार्थ्यांना अध्यापन व मार्गदर्शनाचे काम करत आहेत. या विद्यापीठातील त्यांच्याhttp://fac.ksu.edu.sa/shariefd या वेब पेजवर पोचता येईल.
बनारस हिंदू विद्यापीठ, बंगलोर विद्यापीठ आणि जामिया मिलिया इस्लामिया, ICTP – इटाली, ऑक्सफोर्ड विद्यापीठ, पॉलिटेक्निशीया विद्यापीठ, बुखारेस्ट येथे व्याख्याने देण्यासाठी डॉ शरीफ देशमुख यांना मुख्य वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आलेले आहे.
क्रमवारीसाठी सल्लागार म्हणून डॉ शरीफ QS जागतिक शैक्षणिक सर्वेक्षण २०१६ चे जागतिक विद्यापीठांच्या शैक्षणिक देशमुख यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे. ते गणिताच्या अनेक जर्नल्सच्या संपादकीय मंडळावर तसेच विविध देशांतील संशोधन प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ञांच्या पॅनेलवर देखील आहेत.
सध्या डॉ शरीफ देशमुख औरंगाबाद येथील ऍपल मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल चे संचालक देखील आहेत. डॉ . शरीफ देशमुख त्यांची सर्व ५ मुले आणि त्यांच्या पत्नी वैद्यकीय क्षेत्रातील वेगवेगळ्या विषयातील उच्च शिक्षण घेऊन अनेक आजारांवरील उपचार करणा-या तज्ञ डॉक्टरांमध्ये त्यांचा समावेश आहे.
डॉ . शरीफ देशमुख यांना मिळालेल्या या अद्भुत सन्मानाबद्दल संपूर्ण कुटुंब, मित्रमंडळींच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. डॉ. शरीफ देशमुख हे सध्या भारतात वास्तव्यासाठी आले असून ते.यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्या shariefd@ksu.edu.sa या ईमेल आयडीवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230725_153735-1024x910.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG_20230725_153735-1024x910.jpg)
▪️काय आहे शरीफ देशमुख आणि अंबाजोगाईचे नाते ?
डॉ. शरीफ देशमुख यांनी १९७४ साली गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षण पुर्ण केल्यानंतर ते येथील योगेश्वरी महाविद्यालयात गणित विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले होते. सलग दोन वर्षे त्यांनी या महाविद्यालयात गणित अध्यापनाचे काम केले. महाविद्यालयातील अध्यापनासोबतच त्यांनी शहरातील जोगाई हॉल मध्ये काही काळ गणित विषयाची शिकवणी ही घेतली होती.
वर्गातील शेवटच्या बाकावर बसलेल्या विद्दार्थ्यांना केंद्रबिंदू मानून डॉ . शरीफ देशमुख सरांची शिकवण्याची वेगळी पध्दत होती. देशमुख सर शिकवताना गडबड करणा-या विद्यार्थ्यांचा अचुक नेम धरून त्याला खडुचा तुकडा मारुन त्याचे लक्ष शिकवण्याकडे केंद्रीय करण्यात त्यांचा हातखंडा होता.
डॉ. शरीफ देशमुख यांच्या या दोन वर्षांच्या कालावधीत अंबाजोगाई शहरातील अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंधाने जोडले गेले होते. आज ही डॉ. शरीफ देशमुख यांचा मोठा चाहतावर्ग अंबाजोगाई शहरात आहे.
याशिवाय अंबाजोगाई शहरातील जुन्या पिढीतील प्रसिद्ध वकील आणि सामाजिक कार्यकर्ते ऍड. मिर फरकुंद आली साहेब हे त्यांचे व्याही आहेत. अंबाजोगाई शहरांशी असलेल्या या ऋणानुबंधामुळे डॉ. शरीफ देशमुख यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल त्यांचे अंबाजोगाईतील मित्रांच्या ही वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.