जवळगाव करांनी केला आजी माजी सैनिकांचा -हद सत्कार


मौजे जवळगाव येथे घडले राष्ट्रभक्तीचे दर्शन
अंबाजोगाई तालुक्यातील मौजे जवळगाव येथे राष्ट्रभक्तीचे दर्शन घडले. गावकर्यांनी एकत्रित येत देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणार्या आजी – माजी सैनिकांचा भव्य सन्मान सोहळा आयोजित केला होता. निमित्त होते. भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाचे, या प्रसंगी जवळगाव येथील श्री.हनुमान विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना या सन्मान सोहळ्याने नवी प्रेरणा मिळाली.


तालुक्यातील मौजे जवळगाव येथे गावकर्यांनी एकत्रित येत मोठ्या उत्साहात देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणार्या आजी – माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून आणि फेटा बांधून हृद्य असा सत्कार केला. या कार्यक्रमास मौजे जवळगाव येथील नागरिक, युवक आणि महिला, भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. जवळगाव येथील श्री.हनुमान विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शैलजाताई देशमुख आणि त्यांचे सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सर्व शिक्षक, कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी उपस्थिती होते.


सोबतच अंगणवाडी व बालवाडी वर्गातील लहान मुले ही या कृतज्ञता सोहळ्यात सहभागी झाले. मौजे जवळगाव येथे प्रथमच अशा पद्धतीचा अनोखा सन्मान सोहळा पाहून विद्यार्थी आणि युवक भारावले. त्यांना राष्ट्रभक्ती करण्याची, लष्करात जाण्याची नवी प्रेरणा मिळाली. जवळगावचे सरपंच भगवानराव रावसाहेब हारे, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठीत नागरीक, प्रगतशील शेतकरी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थितीत होते. त्या सोबतच गावातील विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.


मौजे जवळगाव येथील आयोजित आजी – माजी सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आकर्षण ठरले ते सैनिकांचे सर्व्हिस मेडल हे होय, कार्यक्रमास उपस्थित आजी – माजी सैनिकांनी आपआपले सर्व्हिस मेडल स्वतःच्या ड्रेसवर लावले होते. हे मेडल पाहण्यासाठी व आजी – माजी सैनिकांसोबत सेल्फी काढण्यासाठी विद्यार्थी आणि तरूणांनी एकच गर्दी केली होती. या प्रसंगी भारतीय सैन्यात कार्यरत सैनिकांशी हस्तांदोलन करून चिमुकल्यांनी त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या तर माजी सैनिकांचे आशिर्वाद घेतले. येणार्या अनेक पिढ्यांसाठी मौजे जवळगाव येथे आयोजित करण्यात आलेला आजी – माजी सैनिकांचा सन्मान सोहळा हा प्रेरणादायी ठरणार आहे.