जयवंती नदीच्या संवर्धनासाठी कृती समिती सरसावली!
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230327_151503-300x135.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/03/IMG_20230327_151503-300x135.jpg)
नदीपात्रातील कॉक्रेटीकरण थांबवण्याची मागणी
जयवंती नदीच्या संवर्धनासाठी शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीनंतर जयवंती नदी बचाव कृती समितीची निर्मिती करण्यात आली असून आज या कृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना एक निवेदन देवून जयवंती नदी पात्रात सुरु असलेले कॉक्रेटीकरण तात्काळ थांबवण्यात यावे, नदीच्या पात्राची तात्काळ निश्चिती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज कृती समितीच्या वतीने शासनाला देण्यात आला.
नदीचे पात्र निश्चित करा अन्यथा तीव्र आंदोलन
जयवंती नदी संवर्धन समितीच्या वतीने आज कृती समितीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये जयवंती नदीपात्रात सुरु असलेले कॉक्रेटीकरण तात्काळ थांबवण्यात यावे, भुमी अभिलेख विभागाकडे असलेल्या जयवंती नदीच्या नकाशानुसार शहरातील संबंधित अधिकारी आणि कृती समितीच्या प्रमुखांषमवेत जयवंती नदी परीक्रमणा यात्रा काढण्यात येवून पात्र निश्चित तेच्या खुणा करण्यात याव्यात, जयवंती नदी पात्रातील अतिक्रमणे काढण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
अन्यथा तीव्र आंदोलन
या मागण्यांची योग्य दखल घेवून कार्यवाही करण्यात यावी अन्यथा कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
या मान्यवरांचा सहभाग
या निवेदनावर शैलेश कांबळे, सुनील जगताप, महेंद्र निकाळजे, वसंतराव मोरे, गजानन मुंडेगावकर, राजेश वाहुळे, मदन परदेशी, गोविंद मस्के, सचीन वाघमारे, डिजिटल मेडियाचे प्रतिनिधी व इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत.