खोटे व बनावट दस्तऐवज दाखवून जमीन बळकावली
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230412_140858.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230412_140858.jpg)
शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात चुकीची माहिती देऊन जमिनीचे खोटे व बनावट दस्त बनवून फसवणूक केल्याप्रकरणी ८ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230414_120955-1024x753.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230414_120955-1024x753.jpg)
नवनाथ युवराज औताडे (वय ४२ वर्षे, रा. सेलू अंबा, आंबेडकर) यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहरातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात येथे दस्त क्रमांक ६१४१ / २०२२ अन्वये (दि. २४ नोव्हेंबर २०२२) रोजी सदरील जागा नवनाथ औताडे आणि इतर प्लॉट धारकांची असताना देखील याची माहिती आरोपितांनी असताना फसवणूक करण्याच्या उद्देशाने नवनाथ आणि प्लॉट धारकांच्या चुकीच्या चतुरसीमा व प्रतिधित मालक असताना कार्यालयात चुकीची माहिती देऊन मजकूर खोटा आणि बनावट असल्याची माहिती असतानाही चुकीची माहिती देऊन खोटे व बनावट दस्त नोंदवून फसवणूक केली.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230414_120701-1024x655.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/04/IMG_20230414_120701-1024x655.jpg)
नवनाथ युवराज औताडे यांच्या फिर्यादीवरून बद्रीनाथ रामवल्लभ जाजू , सुभाषचंद्र रामवल्लभ जाजू (रा. मंगळवार पेठ, अंबाजोगाई), विष्णुदास वल्लभ जाजू (रा. भीमनगर, कळंब, उस्मानाबाद), राजेश मधुकर इंगोले (रा. ज्योतीनगर, अंबाजोगाई), मयूर श्रीराम गायकवाड (रा. शंकरनगर, अंबाजोगाई), शेख बाबनसाब मोहम्मद शेख (रा. हाऊसिंग सोसायटी, अंबाजोगाई), हारून इब्राहिम शेख (रा. आझादनगर, परळी वैजेनाथ), आणि आशिष ज्ञानप्रकाश इंगोले (रा. धोवा शिंदे, अकोला) याच्यासह कलम ४२०, ४६५, ४६८, ३४ भादवी नुसार शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मेंढके करत आहेत. दरम्यान फसवणूकीच्या घटना शहरात सातत्याने घडत असल्याने खरेदीदाराने जागा, जमीन घेताना काळजीपूर्वक घेणे गरजेचे आहे.