कत्तलखान्यातील २७ गाईंसह ७० जनावरांची झाली सुटका; अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखांची कार्यवाही


कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने अंबाजोगाई येथील कत्तल खाण्यात सूरी लागणाऱ्या 27 गाई सह 70 च्या जवळपास जनावरांची सुटका करून त्यांना जीवदान दिल्या बद्दल आणि परिसरातील नागरिकांची दुर्घन्धी पासुन तात्पुरती सुटका केल्या बद्दल नेरकर मॅडम व सर्व टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरातील बाराभाई गल्ली परिसरात मागील अनेक वर्षा पासुन अनधिकृत पणे जनावरांचा कत्तल खाना सुरू असुन या कत्तल खाण्यात आंबसजोगाईच नव्हे तर जिल्हा व अन्य जिल्ह्यातून गाई कत्तल करण्या साठी आणल्या जातस्त. या कत्तल खाण्याच्या दुर्गंधीचा वास या परिसरातील अर्धा ते पाऊन किलोमीटर अंतरा मधील नागरिकांना सहन करावा लागत असल्याने हा कत्तल खाना बंद करण्यात यावा अशी मागणी अनेक वर्षांपासून नागरिक व गो प्रेमी करत आसुन मागील काही महिन्या पूर्वी ही या कत्तल खाण्यावर पोलीस पथकाने धाड टाकुन 70 ते 80 गायींची सुटका करून त्यांची गो शाळेत रवानगी केली होती. यावेळी अटक आरोपींच्या वतीने या पुढे आम्ही या ठिकाणी गाईंची कत्तल करणार नाही असे शपथ पत्र दिल्या गेले असले तरी या कत्तल खाण्यात गाईंची व अन्य जनावरांची कत्तल सुरूच होती त्या मुळे निर्माण होणाऱ्या दुर्गंधी मुळे नागरिक त्रस्त होते, सोशल मिडियावर नगर परिषद व पोलीस यंत्रणेला ट्रोल केल्या जात होते.
6 जणांवर गुन्हे दाखल


त्या मुळे कार्तिक एकादशीच्या पूर्व संध्येस म्हणजे 3 नोव्हेंम्बर रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास बाराभाई गल्ली, अंबाजोगाई येथील नगरपरीषदेच्या गाळ्यामधील या कत्तल खान्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शना खाली सपोनी शिंदे साहेब, पीएसआय केंद्रे, पोलीस हेडकॉन्स्टेबल तिडके, पो ना तानाजी तागड, पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल दौंड, पोलीस नाईक देवानंद देवकाते, पोलिस अंमलदार रामेश्वर सुरवसे, शुभम राऊत कुलदीप खंदारे, महिला पोलीस नाईक राठोड, महिला पोलीस नाईक गायकवाड तसेच बीड येथील आरसीपी दंगल नियंत्रण पथक यांचे जवान यांच्या पथकाने धाड टाकून कत्तल करण्या साठी आणलेल्या 5,40,000/- रु किंमतीच्या 27 गाई,
66,000/- रु किंमतीचे 11 वासरे, 2,25,000/- रु किंमतीचे 15 बैल 39,000/-रु किंमतीचे म्हशिचे छोटे 11 रेडे व 02 वगारी व 3 लाख 50 हजार रु किंमतीचा MH-26-H-2309 या पासींग नबंरचा पिकअप जनावरे वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो असा एकूण 12 लाख 20 हजार किंमतीचा ऐवज जप्त केला.


या प्रकरणी पिक अप नंबर MH-26-H-2309 मधुन व अन्य वाहनातुन कोठुन तरी वरील गोवंशिय जनावरे कत्तलीसाठी कत्तलखान्यामध्ये आनले व बांधुन टाकले. काही जनावरांची कत्तल केली तसेच कत्तलखान्यामधील जिव गोवंशिय जनावरांना चारा पाणी न टाकता त्यांना निदर्यपणे क्रुरतेची वागणुक दिली म्हणून फय्याज अब्दुल करीम कुरेशी, अमीर मौला कुरेशी, लायक कुरेशी, मुक्तार कुरेशी, फारुक कुरेशी सर्व रा. बाराभाई गल्ली, अंबाजोगाई व दिशान हाफीज रा. सदर बाजार, अंबाजोगाई सह अन्य अज्ञात आरोपी विरुद्ध पो. स्टे अंबाजोगाई शहर
येथे अनिल मधुकर दौंड वय 45 वर्षे व्यवसायः नौकरी, पोह/ 692, नेमनुक अपर पोलीस अधिक्षक कार्यालय, अंबाजोगाई यांच्या फिर्यादी वरून
गूरन 474 /2022 कलम प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधि. 1960 चे कलम 11 (1) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधि. 1976 चे कलम 5 (A)
(1), 5 (A) (2), 5 (B), 5 C, 6, 9, 9A, 11 सह महाराष्ट्र पोलीस अधि. चे कलम 119 अन्वये गून्हा दाखल करण्यात आला असुन पो नी बाळासाहेब पवार यांच्या आदेशाने पूढील तपास पोना 1485 वडकर हे करत आहेत.
70 जनावरांची केली सुटका
कार्तिकी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या पथकाने अंबाजोगाई येथील कत्तल खाण्यात सूरी लागणाऱ्या 27 गाई सह 70 च्या जवळपास जनावरांची सुटका करून त्यांना जीवदान दिल्या बद्दल आणि परिसरातील नागरिकांची दुर्घन्धी पासुन तात्पुरती सुटका केल्या बद्दल नेरकर मॅडम व सर्व टीमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.