महाराष्ट्र
केज मधील एकाधिकारशाही संपवण्या साठी पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा

बाबुराव पोटभरे, हरुणभाई इनामदार, राजेश वाव्हळे बब्रुवान पोटभरे यांची भुमिका
केज विधानसभा मतदारसंघातील एकाधिकारशाही संपवण्यासाठी बहुजन विकास मोर्चा ने पृथ्वीराज साठे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे अशी भुमिका बाबुराव पोटभरे यांनी पत्रपरिषदेत मांडली.
शहरातील पियुष इन हॉटेल मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रपरीषदेत बाबुराव पोटभरे, हारुणभाई इनामदार, राजेश वाव्हळे, बब्रुवान पोटभरे यांनी आपली भुमिका जाहीर केली.
