आ. विक्रम काळे यांच्या विजयाचे अंबाजोगाईत फटाके फोडुन स्वागत !
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230202-WA0230-300x225.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230202-WA0230-300x225.jpg)
शिक्षक मतदार संघातील औरंगाबाद विभागाचे मविआ चे उमेदवार विक्रम काळे हे विक्रमी मतांनी चौथ्यांदा विजयी झाल्याबद्दल अंबाजोगाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला . यावेळी राजकिशोर मोदी यांच्या सोबत बबन लोमटे, तानाजी देशमुख , अमोल लोमटे, महादेव आदमाणे , खालेद चाऊस,महेबूब भाई, खलील जाफरी , अनिल देशमुख , सुनील व्यवहारे, अब्दुल बागवान, सचिन जाधव, स्वप्नील सोनवणे, महेश कदम, शुभम लखेरा, अमोल मिसाळ, धर्मपाल करपे, तौसिफ सिद्दिकी, जावेद गवळी, दत्ता सरवदे , आकाश कऱ्हाड,सुगत सरवदे, शरद काळे, आदीजण उपस्थित होते .
औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार विक्रम काळे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे किरण पाटील, तसेच शिक्षक संघटनेचे उमेदवार यांना मागे टाकत विक्रमी मताधिक्याने सलग चौथ्यांदा विजय मिळवला आहे .यासाठी अंबाजोगाई शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी , माजी आमदार संजय दौंड , पृथ्वीराज साठे , डॉ नरेंद्र काळे,माजी उपाध्यक्ष बबन लोमटे आदींनी मतदानासाठी मेहनत घेतली .
अंबाजोगाई तालुक्यातील सर्व शिक्षकांना प्रत्यक्ष भेटून किंवा त्यांना दूरध्वनीद्वारे त्यांच्यापर्यत पोचून महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांना मतदान देण्याबाबत विनंती केली . याचीच फलश्रुती म्हणून आज मविआ चे विक्रम काळे यांना प्रचंड मताधिक्य मिळाल्याचे दिसून आले . याबाबत अंबाजोगाई शहरात फटाके फोडून विक्रम काळे यांच्या विजयाचे स्वागत व जल्लोष करण्यात आला.