आ. धनंजय मुंडे यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी पद्मावतीमंदीरात अनुष्ठान


नेत्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते कसे असावेत याचा प्रत्यय अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील 36 वर्षीय तरूणाने श्री.क्षेत्र पद्मावती देवी मंदिरात अन्नत्याग करून आ.धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी अनुष्ठाण सुरू केले आहे. यापुर्वी ही त्यांनी अनेकदा आ.मुंंडेंंवर झालेल्या आरोपातून मुक्तता मिळावी यासाठी देखील असे प्रकार त्याने केले होते.


बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कारला मंगळवारी रात्री परळीतील आझाद चौकात अपघात झाल्यानंतर ते जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलविले असले तरी त्यांच्या पुढील प्रकृतीत सुधारणा व्हावी याचे साकडे पुस येथील 36 वर्षीय रानबा रावन उदार या तरूणाने श्री.क्षेत्र पद्मावती देवी मंदिरात अन्यत्याग करून अनुष्ठाण चालु केले आहे. उदार या तरूणाने 2019 च्या विधानसभा निवडणूकीत आ.धनंजय मुंडे विजयी व्हावे यासाठी लग्नाचा त्याग करून पद्मावती देवीकडे प्रार्थना केली होती.


त्यानंतर करूणा मुंडे यांनी केलेल्या आरोपातून आ.मुंडे यांची सुटका व्हावी यासाठी देखील त्यांनी पद्मावती देवीकडे प्रार्थना केली होती. आता अपघातात जखमी झाल्यामुळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी व दिर्घ आयुष्य लाभावे यासाठी मंदिरामध्ये अन्यत्याग करून अनुष्ठाण सुरू केले आहे. याचा आज दुसरा दिवस आहे. आ.मुंडे यांच्या प्रकृती सुधारणा होवून त्यांच्या हातून लोककल्याणाची कामे व्हावीत अशी प्रार्थना देखील ते करत आहेत.


अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील पद्मावती देवीचे मंदिर!