अहमदनगर च्या नावात होणार बदल; आता होणार अहिल्यादेवी होळकर नगर
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230531_201909-1024x349.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/IMG_20230531_201909-1024x349.jpg)
अहमदनगर जिल्ह्याचे नाव हे अहिल्यादेवी होळकर नगर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथे आयोजित 298 व्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सदस्य राम शिंदे, गोपीचंद पडळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर या परिसराची पाहणी केली.
अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी येथे आयोजित 298 व्या पुण्यश्लोक
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती उत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद सदस्य राम शिंदे, गोपीचंद पडळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/image_editor_output_image1371176492-1685544962586-213x300.jpg)
![](https://madhyamnews.com/wp-content/uploads/2023/05/image_editor_output_image1371176492-1685544962586-213x300.jpg)
या ठिकाणी आयोजित जाहीर कार्यक्रमात जिल्ह्यातील 14 तालुक्यातील महिलांना राजमाता अहिल्यादेवी सन्मान करण्यात आला. या वेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की आगामी 300 जयंती ही मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे.
तसेच अहमदनगरचे नाव हे बदलून अहिल्यादेवी होळकर नगर असे करणार करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. तसेच अहिल्यादेवी महामंडळाला राज्य सरकारच्या वतीने दहा कोटी रुपये देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले मी सरकारने धनगर समाजासाठी विविध योजनांना मंजुरी दिली आहे. अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सांगणाऱ्या प्रत्येकाने संघर्ष करायला हवा. राज्य हे राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि शिवाजी महाराज यांच्यासारखे चालवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. विधान परिषद सदस्य राम शिंदे यांनी अहमदनगरचे नाव बदलण्याची मागणी केली होती.