असरडोहकर पुरस्काराचे २२ फेब्रुवारी ला होणार वितरण


युवा पत्रकार शुभम खाडे यांना जाहीर झालेला कै. त्र्यंबक आसरडोहकर प्रतिष्ठान तर्फे दर वर्षी दिला जाणारा ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ यंदा जेष्ठ पत्रकार आणि साहित्यिक प्रा. आसाराम लोमटे (परभणी) यांच्या हस्ते आणि जेष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि किसानपुत्र आंदोलनाचे नेते अमर हबीब यांच्या प्रमुख उपस्थितीत 22 फेब्रुवारी रोजी प्रदान केला जाणार आहे.


आसाराम लोमटे, अमर हबीब यांची उपस्थिती
कार्यारंभ दैनिकाचे उपसंपादक शुभम खाडे यांना यंदाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याचे वितरण 22 फेब्रुवारी रोजी जेष्ठ पत्रकार आणि साहित्यिक प्रा. आसाराम लोमटे आणि अमर हबीब यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम पत्रकार भवन, नोंदणी कार्यालयाच्या वर, येथे होईल.


पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम, फेटा शाल, स्मृती चिन्ह असे आहे. आसरडोहकर प्रतिष्ठानच्या अध्यक्षा किरण आसरडोहकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
दहावा पुरस्कार
आसरडोहकर प्रतिष्ठानचा हा दहावा पुरस्कार आहे. यापूर्वी सय्यद दाऊद (आडस), श्रावण कुमार जाधव (केज), दत्ता देशमुख (विडा), अभिजित गाठाळ (अंबाजोगाई), गोविंद शेळके (घाटनांदूर) कलीम अजीम (पुणे), अतुल कुलकर्णी (बीड) संदिप सोनवलकर (मुंबई), आणि विद्या गावंडे (औरंगाबाद) यांना यापूर्वी मिळालेला आहे.
.