अन्नत्याग आंदोलनात शेकडो किसान पुत्रांनी घेतला सहभाग


शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या १९ मार्च रोजी च्या अन्नत्याग/उपवास आंदोलनात शेकडो किसान पुत्रांनी सहभाग घेतला.
देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या १९ मार्च रोजी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने येथील नगर परिषदेच्या आद्दकवी मुकुंदराज स्वामी सांस्कृतिक सभागृहाहमोरील चिंचेच्या झाडाखाली आयोजित करण्यात आलेल्या अन्नत्याग आंदोलनात शहर व परिसरातील शेकडो किसान पुत्रांनी सहभाग नोंदविला. अन्नत्याग आंदोलनाचे संयोजक सुदर्शन रापतवार यांच्या मार्गदर्शनाखाली व अनिकेत डिघोळकर यांच्या पुढाकाराने सामुहिक उपवास/ अन्नत्याग आंदोलन करण्यात आले होते.


यावेळी उपवास/अन्नत्याग आंदोलनात सहभागी झालेल्या किसान पुत्रांनी शेतकरी धोरणाविरुध्द तीव्र नापसंती व्यक्त केली. यावेळी अनेक किसान पुत्रांनी शेतकरी वेदनेवरील आपल्या कविता सदर केल्या.
या सामुहिक उपवासात सुदर्शन रापतवार,अनिकेत डिघोळकर,
वैजनाथ शेंगुळे, महावीर भगरे, आशा अमर हबीब, योगिनी अनिकेत डिघोळकर, बाबूराव मस्के, विलास काळे, आदित्य काळे, अरविंद पवार, प्रकाश पवार, सुनिल जगताप, प्रा.रमेश सोनवळकर, शरद लंगे, विनायक गाडेकर, पत्रकार दत्तात्रय अंबेकर, व्यंकटेश जोशी, वसंत मोरे,हराजेंद्र घोडके, नागनाथ बडे, भाऊराव मुंडे, प्रा.सागर कुलकर्णी, प्रा. पंडित कराड, प्रा. देवीदास खोडेवाड, भीमाशंकर शिंदे, पत्रकार सुनिल सिरसाट, डॉ. सुरेश अरसुडे, अनिरुद्ध चौसाळकर, प्रा. शैलजा बरूरे, मुजीब काजी, डॉ.नवनाथ घुगे, राजेंद्र रापतवार, सुंदर कर्वे, पत्रकार गजानन मुडेगांवकर, राहुल देशपांडे,


प्रवीण जोगदंड, अशोक तपसे, राजवीर मेहता, पत्रकार सय्यद नईम, ऍड. अनिल लोमटे, ज्ञानेश्वर आपेट, मोईन शेख, प्रकाश बोरगावकर, संतोष मोहिते, ऍड. गोपाल पारिख, प्रभावती अवचर, अनिता कांबळे, पत्रकार अविनाश मुडेगावकर, विशाल अकाटे, पत्रकार, गोविंद केंद्रे, अशोक कचरे, पत्रकार परमेश्वर गित्ते, दगडू लोमटे, ओमकेश दहिफळे, शिवप्रसाद येळकर, योगेश डाके, बन्सी पवार, एस. बी. सुरवसे, बाळासाहेब फूलझळके, पत्रकार प्रशांत बर्दापूरकर, उद्धव शिंदे, वर्षा देशमुख, पत्रकार ऍड. जोगोजी साबने, अथर्व लोहिया, चंद्रशेखर वडमारे, सुभाष बाहेती, अशोक मोदी, पत्रकार रमाकांत पाटील, पत्रकार दादासाहेब कसबे, पत्रकार जगन सरवदे, स्वप्नील बाहेती यांच्या सह अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला.