अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या कार्याचा जगभरात डंका!


सोलापुरच्या व्ही. एम. मेडिकल कॉलेज ला जगातील सर्वात मोठ्या आरोग्य महोत्सवाचा मान!
वर्ल्ड रेकॉर्ड कम्युनिटी या अमेरिकास्थित संस्थेने ‘जगातील सर्वात मोठा आरोग्य महोत्सव’ म्हणून येथील डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयाने वर्ल्डस लार्जेस्ट हेल्थ अँड वेलनेस फेस्टिव्हलचा विश्वविक्रम मंगळवारी नोंदविला. त्याचे प्रमाणपत्र विश्वविक्रम कमिटीचे डॉ. मुकुल सोनी, जीत त्रिवेदी यांनी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख व विद्यार्थ्यांना सुपूर्द केले.
विश्वविक्रमाची नोंद होताच विद्याथ्र्यांनी जल्लोष केला.
सहा दिवसीय आरोग्य उपक्रमाची जागतिक संस्थेने घेतली दखल!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या सहा दिवसांच्या आरोग्य नगरी कार्यक्रमाच्या तयारीसाठी ८०० विद्यार्थी सहा महिन्यांपासून अव्याहत प्रयत्न करत होते. जागतिक विश्वविक्रम नोंदविणाऱ्या कमिटीचे डॉ. मुकुल सोनी, जीत त्रिवेदी यांनी सोलापूरच्या मेडिकल कॉलेजला घोषणा करीत प्रमाणपत्र दिले.
महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवानिमित्त घेण्यात आला उपक्रम
महाविद्यालयाचा हिरक महोत्सव अभिनव पद्धतीने साजरा करण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यानिमित्ताने गुरुनानक नगर येथील विद्यार्थी वसतीगृहाच्या आवारातील १३ एकरांवर १५ ते २० जून दरम्यान ‘आरोग्य नगरी’चे आयोजन केले होते. यामध्ये सात मोठी दालने उभारली होती. पहिल्यांदा रूम साइज मेगा इनफ्लेटेबल मॉडेल व मानवी अवयव प्रदर्शन, आरोग्यविषयक ज्ञान लोकांपर्यंत पोहचविले. रक्तदान शिबिर, देहदान जागरुकता अभियान, आरोग्य शिबिर, ग्लो गार्डन, फाऊंटन शो, मेडिको सोशल फिल्म आदी कार्यक्रम होते.
असे आयोजित केले होते उपक्रम!


पाच दिवसांत १८ हजार लोकांची आरोग्य तपासणी. – ग्लो गार्डनच्या माध्यमातून अवयव, त्यांचे कार्य याबाबत प्रबोधन. • वैद्यकीय तज्ञांचे व्याख्यान, चर्चासत्रे. ‘लेसर शो’तून . लोकजागृती, माहितीपटाचे सादरीकरण आरोग्याविषयी जागरुकतेसाठी नशामुक्ती, ‘डॉक्टरांचे कार्य’ माहितीपटाची निर्मिती करण्यात आली होती.
अव्याहत परीश्रमामुळे सोलापुर चा लौकीक!


आरोग्य नगरीच्या माध्यमातून लोकजागृती, प्रबोधनाची मोहिम राबवण्यात आली. विद्यार्थ्यांची एकजुटी, अव्याहत परिश्रमामुळे सोलापूरचा लौकिक जागतिक स्तरावर पोहचला आहे. यां महाविद्यालयातून जागतिक किर्तीचे डॉक्टर तयार व्हावेत, त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन मिळेल, हा विश्वास आहे.


डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता
विक्रमासाठी घेतले अथक परिश्रम
महाविद्यालयातील ८०० विद्याथ्यांनी ८ विशेष कमिटीच्या माध्यमातून जागतिक विश्व विक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने याचे आयोजन केले.
रोहित तापडिया, समन्वयक, आरोग्य नगरी