अंबाजोगाई जिल्हा निर्मिती; संदर्भ : १


अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात गेली अनेक वर्षांपासून होत असलेल्या मागणीची दखल महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने ४ डिसेंबर २००८ रोजी घेतली आणि या संदर्भात एक शासन निर्णय काढला.
आठ सदस्यांची समिती गठीत
दिनांक ४ डिसेंबर २००८ रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णय क्रमांक प्राफेब११०८/व्हिआयपी५०/प्र.क्र.१६५/मी.१० नुसार अंबाजोगाई जिल्हा निर्मिती संदर्भात एक समिती गठीत करण्यात आली. या शासन निर्णयात असे म्हटले आहे की,
बीड जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्मिती साठी शिफारस करण्यासाठी समिती
१. स्थानिक जनता आणि लोकप्रतिनिधींच्या सातत्याच्या मागणीवरून राज्यातील विद्यमान बीड जिल्ह्याचे विभाजन/पुर्नरचना करून प्रशासकीय व जनहिताच्या सोयीसाठी दोन जिल्हे करण्याचा प्रश्न काही काळ शासनाच्या विचाराधीन आहे. त्यास अनुसरून मंत्रीमंडळ उप समितीच्या बैठकीत, बीड जिल्हाचे विभाजन / पुर्नरचना करून तेथे आणखी एक नवीन जिल्हा निर्माण करण्याबाबत शासनास शिफारस करण्याकरिता विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोणता जिल्हा, मुख्यालय कुठे, भौगोलिक क्षेत्र सुचवण्याची जबाबदारी
२. शासनाच्या उपरोक्त निर्णयानुसार नव्याने निर्माण करावयाच्या जिल्ह्यात कोणती गावे, तालुके इत्यादि भौगोलिक क्षेत्राचा समावेश करावा, नव निर्मित जिल्ह्याने मुख्यालय कोठे असावं त्याचप्रमाणे प्रस्तावित मुख्यालयाच्या शहराची प्रशासकीय व नागरी सोयी-सुविधया बाबतची सद्दस्थिती काय आहे आणि विचाराधीन पुर्नरचना अंतर्गत नवीन जिल्हा कार्यान्वित करण्याकरिता वार्षिक आवर्ती व अनावर्ती खर्च अपेक्षित असेल, इत्यादि सर्व बाबींचा काळजीपूर्वक व सखोल अभ्यास करून तत्संबंधी शासनास शिफारसी करण्याकरिता पुढीलप्रमाणे जिल्हा पुर्नरचना समिती गठीत करण्यात येत आहे.
विभागीय आयुक्त अध्यक्ष तर निवासी उपजिल्हाधिकारी सचीव!
शासनाने नियुक्त केलेल्या समितीत खालील सदस्यांचा होता समावेश
१) विभागीय आयुक्त. औरंगाबाद
(अध्यक्ष)
(२) जिल्हाधिकारी, बीड
(सदस्य)
३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड (सदस्य)
४) अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग. बीड (सदस्य)
५) उप संचालक, भूमि अभिलेख, बीड
(सदस्य)
६) अपर आयुक्त, अदिवासी विभाग, बीड (सदस्य)
७) उप सचिव, महसूल व वन विभाग (म १०) (सदस्य)
८) निवासी उपजिल्हाधिकारी बीड
(सदस्य सचिव)
(भाग…१, क्रमशः)
संकलन : सुदर्शन रापतवार