महाराष्ट्र

अंबाजोगाई जिल्हा निर्मितीस केजचा पाठिंबा; आंदोलनाचा दिला इशारा!

लोकसभा निवडणुकीपूर्वी जिल्हा जाहीर करुन सर्व कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु करा!


बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्मिती करावी अशी मागणी केज येथील रहिवाशांनी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.


या संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्याचे विभाजन करून अंबाजोगाई जिल्हा निर्माण करावा ही गेली अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. बीड जिल्ह्याचे एकुण भौगोलिक क्षेत्र आणि लोकसंख्या लक्षात घेता अंबाजोगाई जिल्हा निर्मिती होणे ही काळाची गरज बनली असून येत्या लोकसभा निवडणुकी पुर्वी अंबाजोगाई जिल्ह्याची निर्मिती करुन जिल्हा स्तरासाठी आवश्यक असलेली सर्व कार्यालये योग्य ती मनुष्यबळ पुरवून सुरु करण्यात यावी, अन्यथा या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.


या निवेदनावर शेकाप चे भाई मोहन गुंड, पत्रकार धनंजय कुलकर्णी, पत्रकार रामदास तपसे, महादेव गायकवाड, पत्रकार डॉ. हनुमंत सौदागर, बाबासाहेब खाडे , पत्रकार गौतम बचुटे, मानधन कारभारी,राहुल खोडवे, सैय्यद वकील, शार्दुल कुलकर्णी, रोहित खोडसे, नितीन गुजर, पापा चव्हाण, बापुराव गायकवाड, महादेव करपे, लक्ष्मण काळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद पांचाळ, सिंदीप शितोळे, अमर धपाटे, पंडीत चाळक, प्रकाश नवगिरे, मनोजकुमार चंदनशिव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker