राष्ट्रीय

अंबाजोगाईच्या पोरांचा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये डंका!! १४ ऑक्टोबर रोजी “कातळशिल्प” शॉर्टफिल्म दाखवणार

१४ ऑक्टोबर रोजी इटली येथे आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोकणातील कातळशिल्पांवर आधारीत तयार करण्यात आलेली “कातळशिल्प” ही शॉर्टफिल्म दाखवण्यात येणार असून या फिल्मची निर्मिती निसर्ग रात्री संस्था आणिअंबाजोगाई येथील दृश्यम कम्युनिकेशन यांनी केली आहे तर या फिल्मचे संगीत दिग्दर्शक अंबाजोगाई येथील ओंकार रापतवार याने केले आहे. अंबाजोगाई येथील या दोन तरुण दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेल्या कातळशिल्प च्या दिग्दर्शनाचा डंका आता जागतिक पातळीवर पोहोचणार आहे.


कोकणातील कातळशिल्पांवरील शॉर्टफिल्म आता इटलीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकेल. पुरातत्त्व शास्त्राच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा फेस्टिव्हल आहे. निसर्गयात्री संस्था आणि दृश्यम कम्युनिकेशन्सने याची निर्मिती केली. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये कातळशिल्पांची नोंद होण्याकरिता या फेस्टिव्हलचा उपयोग होऊ शकतो. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये इटली येथे ‘फेस्टिवल डे’ला (१६ ऑक्टोबर रोजी) कम्युनिक्याझिओन ई-डेल सिनेमा ओर्किओलॉजिको हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील फिल्म फेस्टिवल आयोजित केला जातो. पुरातत्त्व शास्त्राच्या दृष्टीने हा फेस्टिवल महत्त्वाचा आहे. त्यामुळेच जगभरातील इतिहास, संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र विषयातील तज्ज्ञ मंडळींची उपस्थिती याला लाभेल. यातून कातळशिल्पांच्या संवर्धन, संशोधन, अभ्यासाला गती मिळणार आहे.


कोकणातील “कातळशिल्प” या शॉर्टफिल्म ला राहुल नरवणे यांचे दिग्दर्शन तर ओंकार रापतवार संगीत दिग्दर्शक!


या शॉर्टफिल्मची निर्मिती रत्नागिरीच्या निसर्गयात्री संस्था आणि पुण्यातील दृश्यम कम्युनिकेशन्स यांनी केली आहे. या शॉर्टफिल्मचे दिग्दर्शन राहुल नरवणे यांनी केले आहे. लेखन आणि निवेदन सायली खेडेकर हिने केले आहे. सिनेमॅटोग्राफर सतीश शेंगाळे, दत्ता मानकर, संपादन मदन काळे, सत्यम अवधूतवार, मयुरेश कायंदे, संगिताची जबाबदारी ओंकार रापतवार यांनी निभावली आहे. ही शॉर्टफिल्म कोकणातीलकातळशिल्प शोध संरक्षण आणि संवर्धन यावर आधारित आहे. रत्नागिरीतील सुधीर रिसबूड, डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि राजापूरमधील धनंजय मराठे यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी कोकणातील कातळशिल्पांच्याशोध, संशोधनाला सुरुवात केली. त्यात त्यांना यश मिळाले. अथक परिश्रम, अभ्यास, रेखाचित्र, संदर्भ, उपलब्ध माहितीद्वारे त्यांनी ७१ गावांत १७०० पेक्षा अधिक कातळशिल्प रचना १५०० हून अधिक कातळशिल्पे शोधली आहेत. शासन, जिल्हाधिकारी, पुरातत्व विभाग, ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. यातूनच पहिला कातळशिल्प महोत्सव थिबा राजवाडा येथे भरवण्यात आला होता. या वेळी कातळशिल्पांची डॉक्युमेंटरी फिल्मही बनवण्यात आली होती.

▪️कोकणासाठी आनंदाची बाब
———————————–
इटलीतील आंतरराष्ट्रीय फेस्टिवलसाठी निवड झालेली शॉर्टफिल्म ‘कातळशिल्प’ ही कोकणातील कातळशिल्प या विषयावर सविस्तर स्वरूपात लवकरच आपल्या भेटीला येईल. ही कोकणासाठी निश्चितच आनंदाची गोष्ट आहे.

  • सुधीर रिसबूड

▪️अनेकविध प्रकार
——————–
कोकणात आढळणाऱ्या जांभ्या दगडात कातळशिल्पे कोरलेली आहेत. त्यात हत्ती, एकशिंगी गेंडा, मोर, हरिण, माकड, सागरी कासव, मानवी आकार, त्रिकोण, चौकोन अशा भूमितीय आकृत्यांचा समावेश आहे. काही आकृत्या गूढरम्य आहेत. ‘युनेस्को’च्या वारसास्थळांच्या प्रस्तावित यादीत रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी, जांभरुण, कशेळी, रूढेतळी, देविहसोळ, बारसू आणि देवाचे गोठणे या सात, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी, तर गोव्यातील फणसामाळ अशा नऊ ठिकाणांवरील कातळशिल्प रचनांचा यात समावेश आहे.

Sudarshan Rapatwar

महाराष्ट्रातील प्रगल्भ पत्रकार मराठवाड्यातील पत्रकारितेला एक नवा आयाम देण्याचा त्यांचा यशस्वी प्रयत्न असतो. गावातील पत्रकारिता जिल्ह्यात, राज्य आणि देश पातळीवर नेण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker